ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

महिला आरक्षण विधेयक! राहुल गांधींनी वेधले ‘त्या’ दोन चुकांकडे सभागृहाचे लक्ष

नवी दिल्ली : (Rahul Gandhi On Narendra Modi) संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मंजूर तर झाले, पण ते लागू होईल की नाही माहीत नाही. ओबीसी जनगणनेपासून लक्ष हटवण्यासाठी भाजपने हे विधेयक आणलं आणि मंजूरही केलं. भाजप सरकारला ओबीसी जनगणनाच करायची नसल्याने त्यांनी हे आरक्षण लागू केल्याची टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी म्हणाले, ‘महिला आरक्षण हे विधेयक दोन गोष्टींशी संबंधित आहे, त्यापैकी एक महिला आरक्षणापूर्वी जातीय जनगणना करावी लागेल आणि दुसरी सीमांकन प्रक्रिया असेल, पण या दोन्ही प्रक्रियेसाठी काही वर्षांचा कालावधी लागू शकतो. महिला आरक्षण आजही लागू होऊ शकते, पण सरकार ते करू इच्छित नाही. आजपासून 10 वर्षांनंतर ते अमलात येईल, हे सत्य आहे. ओबीसींच्या जनगणनेतून लक्ष हटवण्यासाठी हे सर्व सुरू आहे.

तुम्हाला कशावरून लक्ष हटवायचे आहे? असा सवाल उपस्थित करत त्यांनी मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले. महिला आरक्षण विधेयकात ओबीसी आरक्षणही लागू करावे. देश चालवणाऱ्या संस्था, संसदेतील कॅबिनेट सचिव आणि सचिव हे सरकार चालवतात, मग ९० पैकी केवळ तीन अधिकारीच ओबीसी प्रवर्गातील का आहेत! PM मोदी रोज OBC बद्दल बोलतात, पण OBC प्रवर्गासाठी त्यांनी काय केले, असा सवालही राहुल गांधींनी उपस्थित केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये