ताज्या बातम्या

निलेश राणेंच्या राजकारणातून निवृत्तीच्या घोषणेनंतर सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ‘हा’ मोठा नेता लढवणार असल्याच्या चर्चा!

सिंधुदुर्ग | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे मंगळवारी ( 24 ऑक्टोबर ) तडकाफडकी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर त्यांनी एक पोस्ट शेअर केली. त्यात निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचं कारण स्पष्ट केलं आहे. निलेश राणे यांनी अशाप्रकारे तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानं अनेकांना धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर आता सिंधुदुर्ग लोकसभेची जागा आता रवींद्र चव्हाण लढवू शकतात, अशी चर्चा सुरु झाली आहे.

रवींद्र चव्हाण सिंधुदुर्गातून लोकसभेची निवडणूक लढवणार?

निलेश राणे यांच्या घोषणेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडसाद उमटले. निलेश राणे यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी कणकवली येथे मोठी गर्दी केली. मुंबईवरूनही अनेक कार्यकर्ते कणकवलीच्या दिशेने निघाले. कुडाळ नगरपंचायतीमधील अभिषेक गावडे व प्राजक्ता शिवलकर या दोन नगरसेवकांनी राजीनामे दिले होते.

या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग लोकसभेची जागा आता रवींद्र चव्हाण लढवू शकतात, अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र, याविषयी रवींद्र चव्हाण यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ही सगळी चर्चा सुरु असताना बुधवारी सकाळी रवींद्र चव्हाण अनपेक्षितपणे नीलेश राणे यांच्या भेटीसाठी पोहोचले. राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यावर रवींद्र चव्हाण आणि नीलेश राणे यांच्यात तीन तास चर्चा झाली. त्यानंतर नीलेश राणे हे रवींद्र चव्हाण यांच्यासोबत गाडीत बसून बाहेर पडले. हे दोघे नेमके कुठे गेले, त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील अद्याप समोर येऊ शकलेला नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये