चऱ्होलीत सांडपाण्यामुळे शेतीचे नुकसान; शेतकरी चिंतेत

आळंदी येथील चऱ्होली खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील जाण्या येण्याचे वहिवाटीचे तसेच मंजूर डी. पी. रस्त्यावर परिसरातील नागरी लोकवस्तीत सांडपाणी विल्हेवाट व्यवस्थित नसल्याने सांडपाणी लगतचे शेतीत जात आहे. या सांडपाण्याने रहिवाशासह शेतक-यांना रस्त्यावरून ये जा करण्यास आणि शेती करण्यास गैरसोयीचे झाले आहे.
परिसरात नागरी वस्ती वाढल्याने सांडपाणी देखील वाढले आहे. यात मोठ्या प्रमाणात घाण पाणी साचून घाण वास येत आहे. डास वाढले आहेत. या घाण पाण्यातून ये जा करण्यास गैरसोयीचे होत आहे. या घाण सांडपाण्याची विल्हेवाट तात्काळ लावण्यात यावी अशी मागणी बाधित शेतकरी कैलास पाचुंदे यांनी केली आहे.
या घाणीचे साम्राज्याने शेती खराब झाली आहे. या संदर्भात बाधित व नुकसान ग्रस्त शेतकरी कैलास पाचुंदे यांनी ग्रामसेवक, सरपंच चऱ्होली खुर्द यांना निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. चऱ्होलीतील बोल्हाई माता मंदिर परिसरात सांडपाण्याने शेतीचे नुकसान झाले आहे. सांडपाण्यामुळे शेती करण्यास गैरसोयीचे झाले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. नागरी सेवा सुविधा देण्यास प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
यात मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही हंगाम पिके यामुळे घेता आली नाहीत. शेत जमिनीतुन मिळणारे उत्पन्न बंद झाले आहे. यात यापूर्वीचा मशागतीचा खर्च देखील वाया गेले आहेत. वाल, सोयाबीन, ज्वारी, हरबरा पिके घेतली जात होती. या घाणीचे पाण्यामुळे आमचे नुकसान झाले आहे, असे येथिल हवालदिल शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.