इतरटेक गॅझेटताज्या बातम्यादेश - विदेशपुणेमहाराष्ट्रमाय जर्नी

रेल्वे आरक्षण, फलाट तिकीट, गाडीची माहितीसाठी एकच अ‍ॅप

दिल्ली : 
रेल्वेप्रवासासाठी तुम्हाला जे काही लागेल त्यासाठी आता रेल्वेकडून एकच सुपरअ‍ॅप विकसीत केलं जात आहे. अगदी फलाट तिकीट असेल नाहीतर गाडीची माहिती किंवा आरक्षण असेल अथवा ट्रेन (Train ) मध्ये खाद्यपदार्थ मागवणं, सगळं काही एका अ‍ॅपवर आणि एका क्लिकवर (One Click ) उपलब्ध होणार आहे.भारतीय रेल्वेच्या सर्व सेवासुविधांची माहिती एकाच ठिकाणी मिळवून देण्यासाठी रेल्वे मंत्रालय एक सुपर अ‍ॅप तयार करत आहे. वापरण्यासाठी तर ते सोपं असेलच पण त्यात केंद्रस्थानी आहे तो युजर. युजर्सना वापरण्यास अगदी सुलभ जावे, यासाठी हे अ‍ॅप फायद्याचे ठरणार आहे. या अ‍ॅपमध्ये रेल्वेशी संबंधित सर्वकाही असेल. तिकीटाचं आरक्षण करणं, तिकीट रद्द करणे, प्लॅटफॉर्म तिकीटं आणि अनारक्षित तिकीटं, गाड्यांची चौकशी, पीएनआर (PNR) संबंधी चौकशी, प्रवासादरम्यान खाद्यपदार्थ मागवणे, रेल मदत (तक्रार निवारण मंच) आणि मालवाहतूक संबंधी सर्व माहिती अशा सर्व सेवा या अ‍ॅपमार्फत उपलब्ध होतील. “सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम्स (CRIS) हे अ‍ॅप तयार करत आहेत. सध्या भारतीय रेल्वेतील विविध सुविधांसाठी विविध अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. मात्र सर्व सुविधा एकाच छताखाली आणण्यासाठी आणि प्रवाशांना एकाच अ‍ॅपवर सर्व माहिती मिळण्यासाठी रेल्वे हे सुपर अ‍ॅप तयार करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये