ताज्या बातम्या

आधी बिकिनी, पेपर स्प्रे, वाद आणि आता थेट ‘लिपलॉक’… दिल्ली मेट्रोमध्ये हे होतंय काय ?

Delhi Metro Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र सध्या दिल्ली मेट्रोतील व्हिडिओची संख्या वाढली आहे. दिल्ली मेट्रोतून दररोज अनेक व्हिडिओ समोर येत असतात. हे व्हिडिओ नेहमी वादग्रस्त ठरत असतात. सध्या तर या व्हिडिओची मालिकाच सुरु झाली आहे. दरम्यान असे अनेक व्हिडिओ आतापर्यंत दिल्ली मेट्रोतून (Delhi Metro video) व्हायरल झाले आहेत. अशातच आणखी एक वादग्रस्त व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक जोडपं मेट्रोमध्ये फरशीवर बसून लिपलॉक (liplock) करताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की दिल्ली मेट्रोमध्ये एक मुलगा फरशीवर बसला आहे आणि त्याची गर्लफ्रेंड त्याच्या मांडीवर झोपली आहे. दोघेही बिनदिक्कत आणि न डगमगता एकमेकांना लिपलॉक करत आहेत. समोरच्या सीटवर बसलेल्या एका तरुणाने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्ली मेट्रोमध्ये एका बिकिनी गर्लचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बराच गदारोळ झाला होता. तेव्हापासून दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन म्हणजेच डीएमआरसीकडे मेट्रोमधील अश्लीलता रोखण्यासाठी नियम बनवण्याची मागणी केली जात होती. आता दिल्ली डीएमआरसीने मेट्रोच्या डब्यांवर गस्त घालण्यासाठी फ्लाइंग स्क्वॉड तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. या पथकात पोलीस आणि सीआयएसएफच्या जवानांचा समावेश असेल. गस्त घालणारे सैनिक साध्या पोशाखातही असू शकतात. लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी ते स्वतः मेट्रोने प्रवास करणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये