दहावीचा पेपर देण्यास जाणाऱ्या मुलीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

तर दुसऱ्या घटनेत शाळकरी मुलीलाही मृत्यूने गाठले , पंढरपूर तालुक्यात दोन धक्कादायक घटना
पंढरपूर | पंढरपूर (Pandharpur) तालुक्यात दोन अपघातात (Accident) शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. तालुक्यातील करकंब भागामध्ये या दोन्ही घटना घडल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पहिली घटना ही भोसे येथे घडली. देविदास जमदाडे यांची कन्या अक्षरा ही आज (3 मार्च) सकाळी शाळा सुटल्यानंतर शाळेतून आपल्या घरी जात असताना एका अज्ञात वाहनानं तिला धडक दिली. यामध्ये अक्षराचा मृत्यू झाला.
तर दुसऱ्या घटनेत दहावीचा मराठीचा पेपर देण्यासाठी भावासोबत जाणाऱ्या कु. राधा नवनाथ आवटे हिचा गाडीवर झाड पडून जागीच मृत्यू झाला. बार्डी पाटी-करकंब येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. एकाच दिवशी परिसरातील दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.