वृक्षारोपणाचा उपक्रम राबवणारी शाळा

मज आवडते मनापासूनि शाळा या ओळीतून अनेकांना आपल्याला बालपणीचे शाळेतील दिवस आठवले असतील. शाळेत फक्त मज्जामस्ती आणि सोबत शिक्षणाचे धडे दिले जातात. तसेच रोज घरून रिकामा डबा घेऊन जायचा, मधल्या सुट्टीत शाळेतला मसालेभात खाणारे ते दिवस आठवतात. अशी ही सर्वांना आवडणारी शाळा प्रत्येकाच्या आयुष्यात अविभाज्य घटक बनून जाते. शालेय पातळीवर वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात, अशीच सम्राट अशोक विद्यामंदिर, म.न.पा शाळा क्र. ११७ बी. कर्वेनगर ही शाळा आहे. या शाळेची स्थापना 1974 रोजी झाली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच या शाळेचे मुख्य उद्दिष्ट असून, अत्यंत बिकट परिस्थिती असणारे, झोपडपट्टीमधील स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे कार्य ही शाळा करते. शाळेचं वेगळेपण जपणारा अनोखा उपक्रम या शाळेत राबवला जातो.
यामध्ये शाळा प्रवेशोत्सव : शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेमध्ये आकर्षक सजावट करून मुलांना प्रवेश दिला जातो. मोफत पाठ्यपुस्तक वाटप : इयत्ता 1 ली ते 8 वी च्या मुलांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. तसेच योगदिन : जागतिक योगदिन दिवस शाळेत साजरा केला जातो.
प्लास्टिकमुक्त परिसर : शालेय परिसरातील प्लास्टिक जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावून शालेय परिसर प्लास्टिकमुक्त केला जातो.
वृक्षारोपण – शालेय परिसरात वृक्ष लावून त्याची जोपासना करण्याचे काम विद्यार्थी करतात. मध्यान्ह भोजन : या उपक्रमांतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दररोज डाळ-भात, खिचडी, बिस्कीट, लाडू इ. आहार देऊन त्यांना अन्न आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. एकत्र मिळून सर्व शाळा एका ठिकाणी बसून जेवण करत असते. विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी प्रत्येक शनिवारी विद्यार्थ्यांकडून कवायत करून घेतली आते.
तसेच विविध खेळांच्या स्पर्धा व मार्गदर्शन – हॅण्डबॉल, कबड्डी, क्रिकेट, खो-खो खेळांचा सराव घेऊन स्पर्धांचे आयोजन केले जाते. हॅण्डबॉल टीममधील खेळाडू राज्यस्तरावर खेळतात. मुलांच्या गणिती क्रिया व इंग्रजी विषयांचे अध्यापन करताना गणित पेटी व इंग्रजी पेटी यांसारख्या शैक्षणिक साहित्याचा वापर करून शिक्षण दिले जाते.