ताज्या बातम्यामनोरंजन

“त्या दोन मुलांनी माझा पाठलाग केला अन्…”, ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

मुंबई | Tejasswi Prakash – ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. तिचा चाहतावर्गही लाखोंच्या संख्येत आहे. ‘बिग बॉस’ या शोमधून ती चांगलीच प्रसिद्धीझोतात आली आहे. तसंच सध्या तेजस्वी अभिनेता करण कुंद्राला डेट करत आहे. तर आता तेजस्वी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिनं तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

तेजस्वीनं माध्यमांशी संवाद साधताना तिला लहाणपणी आलेल्या एका धक्कादायक अनुभवाबाबत खुलासा केला आहे. तिनं सांगितलं आहे की, “मी आणि माझी मैत्रीण दररोज सकाळी जॉगिंगला जायचो. आम्ही दोघी जॉगिंग करून झाल्यानंतर चिकन पॅटीस खायचो आणि नंतर घरी जायचो. माझ्या मैत्रिणीचं घर हे माझ्या घराच्या आधी यायचं. नेहमीप्रमाणे आम्ही दोघी पॅटीस खाल्ल्यानंतर घरी जायला निघालो. माझी मैत्रीण तिच्या घरी गेली आणि मी माझ्या माझ्या घराच्या दिशेने जात होते.”

तेजस्वीनं पुढे सांगितलं की, “घराच्या दिशेने मी जात असताना वाटेत अचानक दोन मुलं मला दिसली. सकाळी सहा वाजेल होते त्यामुळे आजूबाजूला कोणीच नव्हतं. त्यामुळे ती दोन मुलं बाईकवरून एकमेकांशी काहीतरी बोलत होती. त्यांनतर त्यांनी माझा पाठलाग करण्यास सुरूवात केली. त्यामुळे मी खूप घाबरले आणि एका सोसायटीमध्ये गेले. पण तेथील सुरक्षा रक्षकांनी मला अडवलं, मी त्यांना विनंती केली पण त्यांनी मला आत सोडलं नाही. त्यानंतर मी त्या सोसायटीच्या बागेत जवळपास अर्धा तास लपून बसले होते. त्यानंतर मग मी घरी जाण्यासाठी बाहेर आले. बाहेर आल्यावरही मला त्या मुलांचा भास होत होता. त्यानंतर माझं घर त्या मुलांना कळू नये म्हणून मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले कारण तिथे तिचे दोन मोठे भाऊ होते त्यामुळे तिथे मी निर्धास्त राहिले.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये