मनोरंजन

रडणाऱ्या नवरीची अतरंगी पाठवणी, माहेरच्यांनी तिचे पाय धरून…

मुंबई | Viral Video| प्रत्येक मुलीसाठी लग्न म्हंटल की, अंगावर शहारे येतात. तो क्षण देखील भावुक आणि हळवा असतो. मुलगी कितीही मोठी झाली तरीदेखील तिच्या आई- वडिलांसाठी, कुटुंबातील सदस्यांसाठी लाडकी बाहुलीच असते. परंतु जेव्हा लग्न होऊन तिला मांडवातून तिच्या सासरी पाठवायची वेळ येते तेव्हा मात्र तिची पाठवणी करत असताना प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. मुलगी आपलं हक्काचं घर, कुटुंब, बालपण सगळं मागे सारून एका अनोळखी घरात जायला निघालेली असते. परंतु आजकाल काही लग्नातील व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये सध्या सर्व इमोशनल ड्रामा राहिला एका बाजूला आणि वेगळाच धिंगाणा पाहायला मिळत आहे. नुकता असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड धुमाकुळ घालत आहे.

व्हायरल होत असणाऱ्या व्हिडीओमधून लग्नानंतर पाठवणीच्या वेळी या वधूने मी जाणार नाहीच असा हट्ट धरला असल्याचं पाहायला मिळत असून तिच्या घरच्यांनी तिला कशाप्रकारे सासरी पाठवलं याबाबत दाखविण्यात आलं आहे. यामध्ये ही नवरी आपल्या पाठवणीच्या वेळी जरा जास्तच भावुक झाली असल्यामुळे ती मोठ्याने रडत आहे. काहीही केल तरी तिचे अश्रू थांबत नसल्याचं पाहायला मिळत असून तिच्या कुटुंबातील सदस्यांनी सरळ तिच्या हात – पायाला पकडून उचलून तिला नवऱ्याच्या गाडीपर्यंत नेलं असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. सुरुवतीला तिच्या माहेरच्या माणसांनी समजावलं असेल पण नंतर या नवरीचा हट्ट बघून माहेरची मंडळी देखील वैतागली मग त्यांनी हा प्रकार केला असावा असे दिसून येत आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मिडियाच्या @bridal_lehenga_designn या इंस्टाग्राम अकाऊंटवरून व्हायरल होत आहे. तर हा व्हिडीओ पाहून अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट करत हे लग्न कमी पण अपहरण जास्त अशा शब्दात प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसंच या व्हिडीओला ४४ हजार व्ह्यूज व हजारहून अधिक लाईक्स आहेत. तर अनेकजण हा व्हिडीओ पाहून हसायला येत असल्याचे इमोजीमध्ये पाठवत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये