ते भाजपमध्ये राहतील का? त्यांचा आत्तापर्यंत चौथा पक्ष आहे; आदित्य ठाकरेंचा राणेंना खोचक सवाल!

मुंबई : (Aaditya Thackeray On Narayan Rane) काल वरळीत बोलताना बोलताना भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले होते, यापुढे मुंबईत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा एकही खासदार निवडून येणार नाही. त्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी आपल्या खास शैलीत राणेंना प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी आदित्य म्हणाले, पुढचा खासदार निवडून येईपर्यंत नारायण राणे स्वःत भाजपमध्ये राहतील की नाही हाच प्रश्न आहे.
दरम्यान ते म्हणाले, आत्तापर्यंत पाहिले तर हा त्यांचा चौथा पक्ष आहे. प्रत्येकवेळी आमच्याबद्दल वाईट बोलायचं, हेच त्यांचे काम आहे. त्यामुळे मी त्यांच्याबद्दल जास्त काही बोलणार नाही. आम्ही कामांवर लक्ष देतो, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं
या सरकारला कुठेही अश्या कामात रस दिसत नाही. काम कमी आणि राजकारणच जास्त सुरू आहे. जे काही राज्यात सुरू आहे, त्यानुसार शिवसेना फोडा, शिवसेनेला कमजोर करा, ठाकरे परिवाराला बाजूला करा, जे जे महाराष्ट्रासाठी आवाज उठवत आहेत त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न होतोय, असंच जर सुरू राहीले तर महाराष्ट्राचे ५ ते ६ तुकडे होतील, अशी भीती आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवली.