महाराष्ट्र

आम आदमी पक्षाने महाराष्ट्रात निवडणूक लढवण्याबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारख्या जाहीर झाल्या असून त्या दृष्टीने आता राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रसह झारखंडमध्ये देखील विधानसभा निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे तर झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे.

झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान १३ नोव्हेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांचे निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होतील. यातच आता आम आदमी पक्षाने महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याचे समोर आले आहे. मतांची विभागणी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला गेला असल्याचे सूत्रांच्या माहितीनुसार समोर आले आहे. याशिवाय इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या दबावामुळेही आपने हा निर्णय घेतल्याचंही बोललं जात आहे.

दिल्लीतील विधानसभा निवडणुकीवर फोकस 

दिल्ली विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करून भाजपाविरोधी मतांमध्ये फूट पडू नये यासाठी महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणूक न लढण्याचा पक्षनेतृत्वाचा विचार आहे. आप दिल्लीतील विधानसभा निवडणुकीवर फोकस करणार आहे. लोकसभा निवडणुकीत आपला दिल्लीत मोठा पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे दिल्लीत विधानसभेवर पुन्हा सत्ता आणण्यासाठी अरविंद केजरीवाल  खास रणनीती आखण्याची शक्यता आहे.  Maharashtra Assembly Election 2024 |

हरियाणात पराभव

हरियाणातील काँग्रेसच्या पराभवानंतर इंडिया आघाडीचे नेते सावध झाले आहेत. फाटाफुटीचा महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत फटका बसू नये, यासाठी ही काळजी घेतली जात आहे. या दोन्ही राज्यांच्या निवडणुकीत आप इंडिया आघाडीला पाठिंबा देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

आपने इंडिया आघाडीत असतानाही काही राज्यांमध्ये निवडणूक लढवली होती. मत विभागणी झाल्याने त्याचा फायदा भाजपला झाला होता. ही मत विभागणी टाळण्यासाठी आता आपने मोठा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. |

हरियाणा विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला मोठा पराभव स्वीकारावा लागला. आपने हरियाणात 88 जागांवर उमेदवार उमेदवार उभे केले होते. मात्र ते येथे खाते उघडू शकले नाही. दरम्यान, आम आदमी पार्टीने 2019 मध्ये महाराष्ट्रात आणि झारखंडमध्ये निवडणूक लढवली होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये