‘आप’ मुंबई महापालिका लढवणार; केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

मुंबई : काहीच दिवसात महापालिका होणार असून सर्वच पक्ष त्याच्या तयारीला लागलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता दिल्ली आणि पंजाबनंतर आम आदमी पार्टीनं मुंबई जिंकण्यासाठी सुरवात केली आहे.तर आज आपच्या मुंबई अध्यक्षा प्रीती मेनन यांनी मुंबई महापालिकेत सत्ता आल्यास मोफत वीज-पाणी देणार असल्याची घोषणा केली आहे.
तसंच मेनन म्हणाल्या की,आपचे ४० हजारहून अधिक कार्यकर्ते गेल्या दहा वर्षांपासून काम करत आहेत.आम्ही मुंबईकरांनसाठी कायमच मूलभूत सुविधा देत आलो आहोत जर आमची मुंबई मध्ये सत्ता आली तर आम्ही वीज-पाणी मोफत देऊ असं त्यांनी म्हटलं. याचप्रमाणे आमचा कायम अजेंडा भ्रष्टाचाराला विरोध करणं हाच आहे. आम्ही सध्या सर्व निवडणुका लढवणार आहोत परंतु, मुंबई महापालिकेसाठी आमचं प्राधान्य रहणार आहे.
दरम्यान, मेनन यांनी भाजपवरही यावेळी टीका केली. भाजप आणि शिवसेना जेव्हा सत्तेत होती तेव्हा ही मुंबईकरांचे प्रश्न सुटले नाहीत आजही ते प्रश्न तसेच आहेत.तसंच आजही मुंबईतील नाले यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.तर आम्ही सफाई, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण यांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.