ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्ररणधुमाळी

राष्ट्रपती निवडणुकीत ‘आप’ची भूमिका स्पष्ट; लढत होणार चुरशीची

नवी दिल्ली (president Elections 2022) : राष्ट्रपती निवडणूक दोन दिवसांवर आलेली असताना देशातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे. देशात सत्ता जरी भाजपची असली तरी राष्ट्रपती निवडणूक जिंकण्याएवढे बहुमत त्यांच्याकडे नाही. त्यामुळे भाजपकडून इतर पक्षांनी पाठींबा द्यावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, भाजप विरोधात असलेल्या शिवसेनेने द्रोपदी यांनाच पाठींबा द्यायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील कॉंग्रेसकडून उघड नाराजी व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रपती निवडणुकीत देशातील सर्व विरोधी पक्षांनी कॉंग्रेसला पाठींबा द्यावा असं काही कॉंग्रेसच्या मित्र पक्षांकडून सांगितल्या जात होतं. त्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी भाजप विरोधी पक्षांना राष्ट्रपती निवडणुकीत कॉंग्रेसला पाठींबा देण्याचं आवाहन करणारं पत्र देखील पाठवलं होतं. दरम्यान, दोन राज्यांत सत्ता असलेल्या ‘आप’ पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

निवडणुकीला दोनच दिवस कमी असताना आपने भाजपच्या विरोधात भूमिका घेतली आहे. आणि युपीएला पाठींबा देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. आपच्या पोलिटिकल अफेअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी माध्यमांना माहिती दिली. आपच्या या भूमिकेमुळे एनडीए सरकारला चांगलीच मेहनत घ्यावी लागणार असल्याचं दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये