अब रूल पुष्पा का; ‘पुष्पा 2’ चा थरारक व्हिडीओ प्रदर्शित

दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) पुष्पा चित्रपटामुळे सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या पार्टनंतर या चित्रपटाचा दुसरा भाग कधी येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. तसंच आता ‘पुष्पा 2’चा (Pushpa 2) थरारक व्हिडीओ समोर आला आहे.

पुष्पा 2 चित्रपटाचा एक व्हिडीओ चित्रपटाच्या निर्मात्यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुनचा किलर लूक पाहायला मिळत आहे.

या चित्रपटाचा व्हिडीओ टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला आहे. तसंच हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर चाहत्यांना ‘पुष्पा 2’ चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

या व्हिडीओच्या सुरुवातीला एक वृत्तनिवेदक पुष्पाबद्दल माहिती देताना दिसत आहे. ‘पुष्पा तिरुपती तुरुंगातून फरार झाला आहे’, असं तो म्हणतो. तर दुसरी न्युज अँकर म्हणते की, ‘पोलिसांनी पुष्पाला पकडण्यासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आहेत.’

पुष्पा फरार झालेल्या बातमीनंतर तो नेमका गेला कुठे? असा प्रश्न सर्वांना पडतो.

तुरुंगातून फरार झालेला पुष्पा हा एका जंगलामध्ये जातो. त्यानंतर एका कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये पुष्पाची झलक सर्वांना दिसते आणि त्याला पाहून सगळे खुश होतात.

पुष्पा-2 चित्रपटाच्या या व्हिडीओत शेवटी सुपरस्टार अल्लू अर्जुन ‘अब रुल पुष्पा का’ हा डायलॉग म्हणताना दिसत आहे. तसंच सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच धुमाकूळ घालत आहे.