‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या दिग्दर्शक, म्हणाले; “बालभारतीच्या गोष्टी म्हणजे इतिहास नव्हे…”
मुंबई : (Abhijit Deshpande Har Har Mahadev Cinema Press Conference) इतिहासाची तोडमोड केल्याच्या आरोपावरुन वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या, अभिजीत देशपांडे दिग्दर्शित ‘हर हर महादेव’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटावरुन जोरदार वाद रंगला राज्याच राजकारण चांगलाच तापल्याचे पहायला मिळत आहे.
दरम्यान, या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यातील लढाईवरुन हा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात चुकीच्या पद्धतीने ऐतिहासिक प्रसंग दाखविण्यात आल्याचे बोललं जात आहे. त्यानंतर या चित्रपटाचे दिग्ददर्शक पुढे येत म्हणाले, ‘बालभारतीच्या पुस्तकातील वाचलेल्या गोष्टी म्हणजे इतिहास नव्हे’, असं अभिजीत देशपांडे यांनी एक प्रकारे चुकांवर पडदा टाकत तो रेटून पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे.
अभिजीत देशपांडे यांनी नुकतंच ई-सकाळला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी हर हर महादेव चित्रपट, त्यात दाखवण्यात आलेला इतिहास, जाती-पातीचं राजकारण या सर्व मुद्द्यांवर भाष्य केले आहे. तसेच यावेळी त्यांनी चित्रपटांबद्दल सुरु झालेल्या वादावर टीकाही केली आहे. तसेच काही मुद्द्यांवर त्यांनी रोखठोक भूमिका घेतली आहे.