ताज्या बातम्यादेश - विदेश

जम्मू काश्मिरमधील कलम 370 हटवणे योग्यच; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

नवी दिल्ली | Supreme Court On Article 370 : सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सोमवारी जम्मू आणि काश्मिरमधील (Jammu And Kashmir) कलम ३७० (Article 370) च्या मुद्द्यावर सुनावणी पार पडली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने जम्मू काश्मिरमधून कलम ३७० हटवण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.

याआधी सर्वोच्च न्यायालयाने ५ सप्टेंबर रोजी १६ दिवसांच्या चर्चेनंतर यावर निर्णय राखून ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना, बीआर गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला आहे.

कोर्टात अॅटर्नी जनरल आर वेंकटरामानी, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, ज्येष्ठ वकील हरीश साळवे, राकेश द्विवेदी, व्ही गिरी आणि इतरांनी कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाची बाजू मांडली. त्याचवेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने कपिल सिब्बल, गोपाल सुब्रमण्यम, राजीव धवन, जफर शाह, दुष्यंत दवे आणि इतर ज्येष्ठ वकिलांनी युक्तिवाद केला.

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवणे घटनात्मकदृष्ट्या वैध असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. अशाप्रकारे केंद्र सरकारने घेतलेला निर्णय पूर्णपणे योग्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये