ताज्या बातम्यामनोरंजन

‘तमाशा’ चित्रपटावर अभिनेत्री प्राजक्ता माळीची प्रतिक्रिया; म्हणाली…

मुंबई | मराठी सिनेसृष्टीमध्ये एकपठोपाठ एक दमदार चित्रपट प्रदर्शित होत आहेत. चंद्रमुखी, धर्मवीर यानंतर आता संजय जाधव दिग्दर्शीत ‘तमाशा लाईव्ह’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट म्हणजे एक सांगितिक नजराणा आहे. नुकतंच या चित्रपटाच्या प्रीमिअर शो चे आयोजन करण्यात आले होते. या प्रीमिअरला अनेक सिनेसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली. यामध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी, मुक्ता बर्वे, क्रांती रेडकर, सायली संजीव यांसारखे अनेक कलाकार उपस्थित होते. त्यावर सर्वांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळीने हिने हा चित्रपट कसा वाटला?असा प्रश्न केल्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

तसंच सोनाली कुलकर्णीने इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अनेक कलाकार हे तमाशा लाईव्ह या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. त्या व्हिडीओ मध्ये प्राजक्ता माळी म्हणाली की, “मला तमाशा लाईव्ह हा चित्रपट खूप आवडला. गेले अनेक दिवस झाले, या चित्रपटाबद्दल सर्वांना ओढ लागली. आता तो लवकरच सर्वांना पाहता येणार आहे. आपण गेले अनेक दिवस झालं पाहतोय की, प्रत्येक घरामध्ये सध्या चित्रपटांपेक्षा, मालिकांपेक्षा जास्त न्यूज चॅनल जास्त प्रमाणत बघितला जात असून या चित्रपटातून आपल्याला त्या बातम्या कशा दिल्या जातात, त्याच्यापाठीमागे किती? काय? घडत असतं हे या चित्रपटात दाखवलं आहे. हा चित्रपट अतिशय उत्तम पद्धतीने लिहिला गेला आहे” असं प्राजक्ता माळी म्हणाली.

दरम्यान, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने या चित्रपटामध्ये अनोखी भूमिका साकारली असून त्यातील गाण्यांवर प्रेक्षकांना ताल धरला आहे. तसंच प्लॅनेट मराठी, माऊली प्रॉडक्शन, एटीएट पिक्चर्स प्रस्तुत यांनी या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. सौम्या विळेकर, डॉ. मनीषा तोलमारे, समीर केळकर, अजय उपर्वात सहनिर्मित या चित्रपटाची कथा मनीष कदम लिहली आहे. तर हा चित्रपट १५ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील यांसारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये