ताज्या बातम्यामनोरंजन

“सुंदर दिसण्यासाठी 50 हजार रुपयांची क्रिम खरेदी केली पण…”, अभिनेत्री तब्बूचा खुलासा!

मुंबई | Actress Tabu – बाॅलिवूड अभिनेत्री तब्बू ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं तिच्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. तसंच तब्बूचे लाखो चाहते देखील आहेत. तब्बूने वयाची पन्नाशी गाठली आहे. तरीदेखील तिचं सौंदर्य आजच्या तरुण अभिनेत्रींना लाजवेल असं आहे. पण तिच्या सौंदर्यामागचं रहस्य नेमकं काय? याबाबत तिनं एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला आहे.

फिल्मी कम्पॅनियनला दिलेल्या मुलाखतीमध्ये तब्बूला तिच्या वाढत्या वयामधील सौंदर्याबाबत विचारण्यात आलं. तेव्हा तिनं अगदी हसत उत्तर दिलं. “माझ्या सौंदर्यामागे कोणतंच सिक्रेट नाही. माझी मेकअप आर्टिस्ट मिताली मला बोलत होती की मॅम तुमची त्वचा खूप सुंदर आहे. तुम्ही यासाठी काही उपाय करता का? मी जर तिला काही उत्तर दिलं तर तिने मला सांगितलं असतं की तुम्ही मी सांगेन त्याप्रकारच्या क्रिमचा वापर करा आणि पुन्हा 50 हजार रुपयांची क्रिम मला दिली असती. एकदाच एवढी महागडी क्रिम मी खरेदी केली. पण आता पुन्हा नाही.” असं तब्बूने या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

पुढे ती म्हणाली, “आपल्याला कशाप्रकारे सुंदर दिसता येईल हे मला चांगलं ठाऊक आहे. त्यामध्ये मी काहीच बदल करत नाही. सगळ्यांनाच चांगलं दिसायला आवडतं. तसंच निरोगी राहायला आवडतं. मी देखील तेच करते.” 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये