पुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

शिंंदे गटात पुण्यातल्या शिव सैनिकांची भर..

पुणे : राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिी दौर्‍यानंतर पंढरपूरकडे रवाना झाले मात्र पंढरपूरला जाताना त्यांनी पुण्यात एक सत्कार कार्यक्रम स्वीकारला तेव्हा पुणे विमानतळावर उतरल्या नंतर पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी त्यांचं स्वागत केलं, यावेळी त्यांच्या सोबत शिवसेनेचे पुण्याचे माजी शहर प्रमुख आणि पुणे शहर सह संपर्क प्रमुख अजय भोसले, युवासेनेचे महाराष्ट्र सचिव किरण साळी आणि पुरंदर चे माजी आमदार विजय शिवता हे देखील होते.

या भेटीनंतर पुण्यात शिवसेनेला खिंडार पडल्याचे दिसून आले गेली अनेक दिवस राज्यातल्या बंडानंतर पुण्यात काही नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना सुरू झाल्या होत्या मात्र या चर्चांना काही अर्थ नसल्याचे शिवसेना शहर प्रमुख संजय मो यांनी सांगितल होत मात्र आता काही पदाधिकारी आणि नगरसेवक शिंदे गटात गेल्याने पुण्यात शिवसेनेला खिंडार पडल्याच्या चर्चावर शिक्कमोर्तब झाला आहे तर अजय भोसले आणि किरण साळी यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले विश्वासनीय सूत्रांकडून समजते आहे. पुण्यात विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आल्यानंतर खा. गिरीश बापट यांनी त्यांचे शिंदेशाही पगडी घालून स्वागत केले यावेळी अजय शिंदे, किरण साळी आणि विजय शिवता उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये