आदित्य ठाकरेंनी हटवला ट्विटर अकाऊंटवरून मंत्रीपदाचा उल्लेख
![आदित्य ठाकरेंनी हटवला ट्विटर अकाऊंटवरून मंत्रीपदाचा उल्लेख adity thackeray](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/adity-thackeray-780x470.jpg)
मुंबई | सध्या राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसंच शिवसेनेनं भाजपासोबत सरकार बनवावं, मंत्रिपद दिलं नाही तरी चालेल अशी भूमिका एकनाथ शिंदेंनी घेतली आहे. आज दुपारी शिंदे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार असून आपला गट हीच खरी शिवसेना असा दावा त्यांनी केला आहे. यादरम्यान, राज्याचे कॅबिनेट मंत्री अदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मंत्रीपदाचा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्यात शिवसेनेकडे असणारी अतिरिक्त मतं काँग्रेससाठी वापरण्याच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण झाला होता. तसंच शिवसेनेची अतिरिक्त मतं काँग्रेससाठी वापरण्याला शिदेंचा विरोध होता.
![आदित्य ठाकरेंनी हटवला ट्विटर अकाऊंटवरून मंत्रीपदाचा उल्लेख tweet](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/tweet.jpg)
दरम्यान, एकनाथ शिंदेंचा अतिरिक्त मतं काँग्रेससाठी वापरण्याला विरोध होता. दोन दिवसांपूर्वी रिनायसेन्स हॉटेलमध्ये वाटाघाटी सुरु होत्या. विधान परिषदेसाठी मतदान कशापद्धतीने केलं जावं याबद्दल चर्चा सुरु होती. याच मुद्द्यावरुन शिंदेंचे राऊत आणि आदित्य ठाकरेंशी मतभेद झाले. शिवसेनेची मतं वापरुन काँग्रेसचा उमेदवार निवडून देण्याच्या कल्पनेला शिंदेंचा विरोध होता.