ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

जयंत पाटलांच्या निलंबनानंतर राष्ट्रवादी आक्रमक, शरद पवारांनी केला अजित पवारांना फोन अन्…

नागपूर | Sharad Pawar Call To Ajit pawar – सध्या हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरू असून आज (23 डिसेंबर) या अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. मात्र, काल (22 डिसेंबर) विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानं एकच गदारोळ झाला. त्यानंतर जयंत पाटील यांना निलंबित (Suspension) करण्यात आलं. तसंच या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. तर पाटलांच्या निलंबनानंतर राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

जयंत पाटील यांनी अपशब्द वापरल्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलं. त्यानंतर अजित पवार यांनी जयंत पाटलांची पाठराखण केली. दरम्यान, शरद पवार यांनी अजित पवारांना फोन करुन सभागृहात नेमकं काय घडलं होतं याबाबतची सविस्तर माहिती घेतली आहे. मात्र, दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे.

दरम्यान, आज सकाळी अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटलांवर करण्यात आलेल्या कारवाईचा उल्लेख करत राज्य सरकारवर टीका केली. जयंत पाटील अध्यक्षांना निर्लज्ज म्हणाले नाहीत असा दावाही त्यांनी यावेळी केला. “गेल्या 32 वर्षांपासून जयंत पाटील सभागृहाचे सदस्य आहेत. सर्वांनी त्याचं वागणं, बोलणं, कारकिर्द पाहिली आहे. ते काही अध्यक्षांना निर्लज्जासारखं काम सुरु आहे असं म्हणाले नाहीत. 30-32 वर्षं मी पण काम करत आहे. अनेकदा आपण सरकारला काही लाज आहे की नाही असं म्हणत असतो. सरकार निर्लज्जासारखं वागत आहे, अशी विधानं सभागृहात करण्यात आली आहेत. पण हे फार सोयीचं राजकारण करतात,” अशी टीका अजित पवारांनी केली.

“मुंबई सोन्याचं अंडं देणारी कोंबडी समजतात असं विधान छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केल्यानं इतका गोंधळ घालण्यात आला. पण याआधी विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीसांनी काम पाहिलं तेव्हा मुंबईला सोन्याची कोंबडी अशी उपमा दिली होती. सागर म्हणून आमदार आहेत त्यांनीही तशीच उपमा दिली आहे. प्रवीण दरेकरांनी देखील तसा उल्लेख केला होता. मात्र, यांची लोकं बोलली की सगळं योग्य असतं आणि विरोधी पक्ष म्हणून आमच्यातील काही सहकारी बोलले तर सत्तेच्या, बहुमताच्या जोरावर कामकाज थांबवायचं. मग माफी मागा, दिलगिरी व्यक्त करा अशा वल्गना करणं हे योग्य नाही”, असंही अजित पवार म्हणाले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये