“अग्निपथ योजना लष्करावर ताबा मिळवण्यासाठी RSS चा छुपा अजेंडा”

सध्या अग्निपथ योजनेबाबत सरकार ठाम असल्याचं सैन्य दलाच्या प्रमुखांनी काल स्पष्ट केलं आहे. या निर्णयाला देशातील अनेक राज्यामधून विरोध होत आहे. यातच आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी या योजनेसंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपानंतर भाजपने त्यांना सडेतोड उत्तर देखील दिल आहे.
कुमारस्वामी म्हणाले की, ‘आरएसएस’ लष्करावर ताबा मिळविण्याचा विचार करत आहे. ज्या काळात आरएसएसची स्थापना झाली त्या काळात जर्मनीमध्ये हिटलरची राजवट होती, यामुळे, आता आरएसएसला देशात नाझी राजवट लागू करण्याची आहे. यामुळे ही अग्निपथ योजनेची सुरवात करायची आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, आरएसएसचा आपले कार्यकर्ते लष्करात भरती करून आपला प्रसार करायचा छुपा अजेंडा असल्याचं देखील कुमारस्वामी म्हणाले. तसंच त्यांनी “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते त्यांची नियुक्ती करणार, की लष्कर? असा सवाल विचारत भरती प्रकियेवरतीच प्रश्न उपस्थित आहे. आता जी 10 लाख युवकांना भरती करून घेणार आहेत त्यातील अडीच लाख आरएसएसचे कार्यकर्ते भरती करू शकतात. असं देखील ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे भाजपकडून देखील सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे. हा लष्कराचा अपमान असल्याचं भाजपने म्हटलं आहे