देश - विदेश

‘या’ अटी शर्तींवर ठरलं, MIM चा शिवसेनेला पाठींबा!

मुंबई – Rajyasabha Election | आज राज्यात बहुप्रतीक्षित राज्यसभा निवडणूक (Rajyasabha Election) पार पडत आहे. संपूर्ण राज्याचं या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे. सायंकाळी सात वाजता या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. आत्तापर्यंत 260 आमदारांचं मतदान पूर्ण झाल्याची माहिती आहे. या निवडणुकीत एमआयएम पक्ष कोणाला पाठींबा देईल याकडे लक्ष लागलेलं होत मात्र पक्षाने आपला निर्णय सांगितला आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. एमआयएम पक्ष महाविकास आघाडीला काही अटीं आणि शर्तींवर पाठींबा देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केल आहे. मात्र महाविकास आघाडीतील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यासाठीच पाठींबा दिला जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेनेसोबत आपले वैचारिक मतभेत कायम असणार असल्याचंही त्यांनी यावेळी संगीतलं आहे.

‘या’ ठेवल्या महाविकास आघाडीसमोर अटी

एमपीएससी मध्ये अल्पसंख्यांक सदस्याची नियुक्ती करण्यात यावी. धुळे आणि मालेगावमधील आमदारांच्या विकासासाठी काही अटी. महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे उत्पन्न वाढवण्यासाठी पावले उचलावीत. अशा प्रकारच्या अनेक मागण्या पूर्ण करण्याच्या अटीवर इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला पाठींबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

एमआयएमची भूमिका आजपर्यंत स्पष्ट नव्हती मात्र मध्यरात्री शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरु असलेल्या मुंबईतील ट्रायडंट हॉटेलवर इम्तियाज जलील उपस्थित होते. शिवसेना नेते आणि इम्तियाज जलील यांच्या अद्श्या तासापेक्षा जास्त वेळ चर्चा झाली आणि काही अटी शर्ती ठरल्यानंतर सकाळी इम्तियाज जलील यांनी ट्विट करून महाविकास आघाडीला पाठींबा देणार असल्याची घोषणा केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये