‘त्या’ वक्तव्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; म्हणाले, “मी महापुरूषांबाबत…”

मुंबई | Ajit Pawar – विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून सडकून टीका केली जात आहे. तसंच त्यांनी माफी मागावी अशी मागणी देखील सत्ताधाऱ्यांनी केली आहे. दरम्यान, यावर आता अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले की, मी संभाजीराजांच्या स्मारकासाठी पाठपुरावा केला आहे. मी महापुरुषांबाबत, स्त्रियांबाबत कधीही चुकीचं बोललो नाही. मी माझ्या भूमीकेवर ठाम आहे. महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य राज्यपाल, मंत्री, सत्ताधारी आमदारांनी केली आहेत. त्या भाजप (BJP) आमदारांवर कारवाई कधी करणार? असा सवाल उपस्थित करत भाजपनं माझ्या विरोधात आंदोलन करण्यास प्रोत्साहित केल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे.
महापुरुषांबद्दल, स्त्रियांबद्दल मी कधीही चुकीचं बोललो नाही. मला भाजपनं विरोधी पक्ष नेते पद दिलेलं नाही त्यामुळे त्यांना राजीनामा मागण्याचा अधिकार नाही. माझ्याविरोधात भाजपनं आंदोलन करण्यास प्रोत्साहित केलं आहे. सत्ताधारी पक्षांनी महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्यं केली आहेत. त्यांच्यावर कारावाई होत नाही. ते माफी मागायला तयार नाहीत, दिलगिरी व्यक्त करत नाहीत. मी वादग्रस्त वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळे मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, असंही अजित पवार म्हणाले.