ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

पवारांना भोंदुबाबा म्हणणाऱ्या, बावनकुळेंना अजितदादांनी सुनावले, ‘जाणीवपूर्वक चुकीची वक्तव्य …’

पुणे : (Ajit Pawar On Chandrashekhar Bavankule) विरोधकांच्या काही नेते मंडळींकडून जाणीवपूर्वक चुकीची वक्तव्य करून राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरु केला जात आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नसून, महाराष्ट्रातील वडीलधाऱ्या नेत्यांनी कधीही आपल्याला अशा प्रकारची चुकीची वक्तव्य करणे शिकवले नाही. कोणत्याच पक्षाच्या नेत्याकडून तसंच प्रवक्त्याकडून, पक्षप्रमुखांकडून अशा प्रकारची वक्तव्य होऊ नयेत, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. शरद पवार हेच राष्ट्रवादीचे भोंदुबाबा आहे आणि त्यांनी जादुटोणा करून उद्धव ठाकरेंना जाळ्यात ओढलं, असे बावनकुळे साताऱ्यात दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी या वक्तव्याचा निषेध केला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही रस्त्यावर उतरून बावनकुळेंविरोधात निदर्शनं केली होती.

आज बारामती दौऱ्यावर असलेल्या अजितदादांनी येथे विविध विकास कामांची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्यासंदर्भात मंगळवारी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मी बोलणार असल्याचे ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये