ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“…म्हणूनच एकनाथ शिंदेंनी एवढं मोठं धाडस केलं”; पवारांनी सांगितलं कारण

पुणे : (Ajit Pawar On Eknath Shinde) एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांसह शिवसेना पक्षाविरोधात बंडखोरी केली अन् शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील तत्कालीन महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यावर शनिवार दि. 8 रोजी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड येथे पत्रकार परिषदेत मोठं विधान केलं आहे.

दरम्यान, दोन दिवसांपुर्वी उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात म्हणाले, “आम्ही दोन-अडीच वर्षापासून आपलं सरकार येईल असं सांगत होतो, हे सांगायला मी काय वेडा नव्हतो. त्यासाठी आम्ही सातत्याने योजना आखत होतो असा खुलाचा केला”, यामुळे शिंदे गट तोंडावर पडला आहे. यावर प्रश्न विचारला असताना पवारांनी देखील त्याच प्रकारे उत्तर दिलं आहे.

अजित पवार म्हणाले, भाजपचे 105 आमदार निवडून आले होते, तरी त्यांना सरकार स्थापन करता आले नाही. त्यामुळेच ते विविध मार्गांनी सरकार पडण्यासाठी प्रयत्न सुरू होते. महाविकास आघाडी सरकार पडण्यासाठी मोठी शक्ती कार्यरत होती. हे शिंदेंनी देखील त्यांच्या समर्थक आमदारांना गुवाहाटीत असताना स्पष्ट सांगितलं आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदेंनी एवढे मोठं धाडक केलं आहे,” असे अजित पवारांनी केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये