माय जर्नी

‘सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली’

धावपळीच्या जीवनात मनसोक्त आनंद घ्यायला आणि स्वतःच्या चांगल्या- वाईट सवयीकडे पाहायला कोणाला वेळच मिळत नाही, असं आपण म्हणत असतो. तर काही माणसं कितीही धावपळीच्या जीवनात जगत असली तरीही स्वतःच्या यशाच्या आणि अपयशाच्याबाबतीत जागरूक असतात. असं म्हणतात की, कष्टाला पर्याय नाही. तसंच जर कष्ट केलं तर अपयश कधीच येणार नाही, हे ही तितकंच खरं आहे. आज आपण अशाच कष्टाळू, जिद्दी आणि प्रेरणादायी व्यावसायिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रशांत तानाजी माने यांचा प्रवास जाणून घेणार आहोत. त्यांच्या कामाचा दर्जा आणि त्यामुळे ग्राहकांचे होणारे समाधान हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ते सर्वसामान्य कुटुंबात लहानाचे मोठे झाले आहेत. सातारा गाव असले तरीही पूर्ण शिक्षण पुण्यात झाले.

घरात आई- वडील आणि पत्नी असं छोटसं पण त्यांच्या प्रत्येक निर्णयात खंबीरपणे पाठीशी उभं असणार कुटुंब. तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्टाच्या मार्गावर चालत असताना गवसलेला आत्मविश्वास आणि त्यातून केलेली वाटचाल हीच प्रशांत मानेच्या टॅक्स consultant आणि सीसीटीव्ही या उद्योगाचा राजमार्ग ठरला आहे. सुरुवातीला पुण्यासारख्या अनोळख्या शहरात वावरताना त्यांना दडपण होतंच. परंतु, आपण देखील इतरांपेक्षा वेगळं काहीतरी केलं पाहिजे, असं त्यांना वाटत असल्यामुळे त्यांनी जे काम मिळेल, ते करायला सुरुवात केली. काही काळ घरगुती मेस देखील चालवली. तसेच एक्स्पोर्ट कंपनीमध्ये जॉब देखील केला. त्यानंतर त्यांनी स्वतः व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले.

त्यातून त्यांनी स्वतःची २०१७ ला TAX SOURCE FINANCIAL & SERVICES, आणि S.P ENTERPRISES पुणे अश्या दोन कंपन्या सुरु केल्या आहेत. त्याच्या या व्यवसायातून गरजू युवकांना नोकरी मिळत आहे. तसेच प्रशांत माने सांगतात की, सध्या बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. पैसा नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा चांगली माणसे तयार करा आणि एक विचार म्हणून एकत्र या. पैसा सहजरीत्या जमा होतो. त्यासाठी स्वतःची चांगली प्रतिमा आणि सकारात्मक विचार असणं सुद्धा गरजेचं आहे. याचप्रमाणे जी.एस.टी. आल्यापासून या क्षेत्रात प्रचंड स्कोप वाढला आहे. वाढत्या इंडस्ट्री, सोसायटीमुळे सीसीटीव्ही यंत्रणेसह फायर अलार्म, टाइम अटेंडन्स सिस्टिम, होम ऑटोमायझेशनची मागणी वाढली आहे. ज्ञान व अनुभवाच्या जोरावर या क्षेत्रात केलेल्या मेहनतीचे फळ मला मिळाले आहे. कोणतंही काम करताना त्यामध्ये सातत्य ठेवायला हवं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये