फिचरमाय जर्नीराष्ट्रसंचार कनेक्ट

योगऊर्जा स्टुडिओच्या माध्यमातून फिटनेसचे धडे

देवयानी मांडवगणे, उद्योजिका

आपण दैनंदिन जीवनात कितीही धावपळ करत असलो तरीही आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करता कामा नये. यासाठी रोज योगा, व्यायाम करणे गरजेचे आहे. तसेच आरोग्य समस्यांचा मुळापासून अभ्यास करून अनेक लोकांना योग आणि व्यायाम याचे महत्त्व पटवून देण्याचे काम पुण्यातील कोथरूड परिसरात ‘देवयानीज योगऊर्जा’ या नावाने योगा व थेरपी स्टुडिओ सुरू करणाऱ्या देवयानी मांडवगणे या आहेत.

देवयानी यांनी व्हीआयटी या महाविद्यालयातून इलेट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या विषयात इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. परंतु इंजिनिअरिंगच्या आयटी कंपनीच्या थंड हवेत त्या रमली नाहीत. त्यांॆची स्वप्न, जिद्द आणि ध्येय त्यांना सतत खुणावत होते. योगाच्या माध्यमातून सर्व वयोगटांतील लोकांना उत्तम आरोग्य लाभले पाहिजे, यासाठी देवयानीने प्रशिक्षण घेऊन स्वतः योगाच्या माध्यमातून लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी हेच करिअर म्हणून निवडले. त्यांची आई संस्कृत विषयातील पीएचडी आणि घरात योग या विषयाला पोषक असे वातावरण असल्याने योगाकडे असलेली त्यांची ओढ अजून घट्ट झाली. तसेच मुंबईत काही काळ त्यांनी फिटनेसशी निगडित मॉडेलिंग केले. त्यामुळे त्यांना अमेरिका, कॅनडा, चीन, ऑस्ट्रेलिया, दुबई आदी देशांतील वेगवेगळ्या फिटनेससंबंधीच्या मॉडेलिंग स्पर्धांत सहभागी होता आले.

याचा फायदा त्यांना जगभरात फिटनेस व आरोग्य या क्षेत्रात चालू असणाऱ्या नवनवीन घडामोडी समजून घेण्यासाठी झाला. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदर त्यांनी पुण्यामध्ये लोकांच्या घरी जाऊन योग प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. हा प्रवास खडतर होता. हळूहळू योगा स्टुडिओसाठी कोथरूडमध्ये जागा शोधली. जागा भेटल्यानंतर त्यांच्या या क्लासची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. देवयानी यांच्या हसऱ्या चेहऱ्यामुळे आणि स्वभावामुळे सर्व वयोगटातील मुले, मुली, महिला, पुरुष सहभागी होत गेले. अशा प्रकारे त्यांनी स्वतःची योगथेरपी सुरू केली. स्त्रिया शरीरात होणाऱ्या बदलांमुळे आत्मविश्वास गमावून बसतात. माझी अशी इच्छा आहे, की सर्वसामान्य व्यक्ती किंवा गृहिणी सक्षम राहाव्यात. योगाबद्दलच्या जागरुकतेमुळे नक्कीच अनेक स्त्रिया आपलं आरोग्य उत्तम ठेवू शकतात. योग केल्यावर नक्कीच शरीर, मन निरोगी राहते. याचे महत्त्व मी माझ्या योगऊर्जा स्टुडिओमधून देत असते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये