Top 5कव्हर स्टोरीमाय जर्नीलेखविश्लेषणशिक्षणसंपादकीयसक्सेस स्टोरी

वनौषधी मानवी प्रणालींशी जैविकदृष्ट्या अधिक सुसंगत

डॉ. कीर्ती माणिक नितनवरे
हुतात्मा राजगुरू महाविद्यालय,
राजगुरुनगर, ता. खेड, जि. पुणे

विषय – वनस्पतीशास्त्र
शीर्षक – आयसोलेशन, कॅरेक्टरायझेशन, एप्लीकेशन अँड इलिसिटेड प्रोडक्शन ऑफ बायो ऍक्टिव्ह मेटॅबोलाइट्स फ्रॉम सम सिलेक्टेड इंडिजिनस स्ट्रेन ऑफ सायनो बॅक्टेरिया. (ठराविक हिरवे निळे शेवाळातून जैविक मूलद्रव्याचे गुणवर्णन आणि जास्तीत जास्त उत्पादन)
मार्गदर्शकाचे नाव- डॉ. टी. डी. निकम.
पीएचडी संपादन केल्याचे वर्ष- ऑगस्ट २०१३.

वनस्पतीपासून तयार केलेले औषधे मानवी प्रणालींशी जैविकदृष्ट्या अधिक सुसंगत असतात आणि कृत्रिम औषधांपेक्षा तुलनेने कमी विषारी असतात. अशा औषधांची जगभरातील मागणी गेल्या काही दशकांमध्ये उल्लेखनीय पातळीवर वाढली आहे.

दुसरीकडे विद्यमान संसाधनांचे शोषण, जंगलाचा नाश, जमीन आणि हवामान बदल यामुळे प्रजाती नष्ट होत आहेत. त्याच वेळी, वातावरणातील रोगजनकांची संख्या आणि त्यांच्या अानुवांशिक लवचिकतेमुळे रोगांचा धोका वाढतो. त्यामुळे वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आणि प्रभावी औषधे मिळविण्यासाठी विविध प्रकारच्या जीवांची तपासणी करणे आवश्यक आहे.

सायनोबॅक्टेरिया (हिरवे निळे शेवाळ) सर्वात आदिम आहेत, ते वेगवेगळ्या अधिवासांमध्ये आढळू शकतात. मोठ्या प्रमाणात संशोधनाची गरज आहेत, त्यामुळे या संशोधनात बायोएक्टिव्ह मेटाबोलाइटचे पृथक्करण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सदर संशोधनात भारताच्या पश्चिम घाटातील पुणे विभागातील १८ हिरवे निळ्या शेवाळाच्या प्रजातींचे संकलन आणि विलगीकरण करण्यात आले आहे. यामध्ये लेप्टोलिंगबाया या नावीन्य पूर्ण प्रजातीचा शोध लावला. ही प्रजाती आधुनिक मानवी वैद्यकीय उपचार पद्धतीत जसे की बुरशीजन्य आजार व कर्करोग निदानासाठी व प्रति जैविक निदानासाठी उपयुक्त आहे.

हा शोधनिबंध समस्त वैद्यकीय व मानव जातीच्या वैद्यकीय अभ्यास व निदानाला भावी पिढीस मार्गदर्शक व संदर्भासाठी महत्त्वाचा व उपयुक्त ठरणारा आहे. या संशोधनाचा मुख्य उपयोग स्त्रियांमधील बीजांड कोशातील कर्करोगाचे प्रत्यक्षपणे निदान करण्यासाठी जाऊ शकतो व त्यामुळे स्त्रियांमधील प्रत्यक्ष मृत्युदर घटण्यात मदत होऊ शकते.

(शब्दांकन : अमितकुमार टाकळकर)

Related Articles

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये