Top 5कव्हर स्टोरीलेखविश्लेषणसंपादकीय

इच्छाशक्तीच्या जोरावर यश नक्की : मनीषा निश्चल लताड

गायिका मनीषा निश्चल यांनी डिसेंबर २०१८ मध्ये आपल्या गायन कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण केली. मराठवाडा व विदर्भात चार हजार लहान मोठ्या शोजमध्ये स्वतःला सादर करून आज विविध भव्य शोजचा एक अविभाज्य भाग कधी बनल्या कळलेही नाही. पूर्ण नाव मनीषा निश्चल -लताड. परंतु कार्यरत क्षेत्रात “मनीषा निश्चल” या नावाने ओळख आहे.

मनीषा केशवराव कान्हेगावकर हे माहेरचे नाव. माझे शिक्षण एम.ए. (संगीत) व संगीत विशारद (गंधर्व महाविद्यालय) झाले असून, दहावीपर्यंतचे शिक्षण शेवाळा, ता.कळमनुरी, जि. हिंगोली येथे झाले व पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी औरंगाबाद येथे आल्यानंतर संगीत या विषयात भविष्य घडवायचे असे ठरवले आणि मागे वळून पाहिले नाही. सध्या अनुराधा मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची संगीत साधना सुरु आहे.

आज अनेक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. असे असले, तरी अनेक महिलांमध्ये कलागुण असूनदेखील त्या बाहेर पडू शकत नाही. मुळात त्यांची स्वत:ची पण इच्छा नसते . पण इच्छाशक्ती आणि घरातल्यांची साथ आपल्याला यशस्वी होण्यास मदत करते.

नवदुर्गा भूमिकेतून सांगावे वाटते, की पुढची पिढी चांगली घडावी यासाठी प्रयत्न करताे तसे महिलांनी स्वत:कडे लक्ष दिले पाहिजे. आपल्या आवडीनिवडी जपा, ज्यामुळे तुम्हाला आणखी बळ मिळेल. सर्व सांगीतिक प्रवासात माझ्या मिस्टरांची निश्चल लताड यांची मोलाची साथ असल्याचे त्या आवर्जून सांगतात. तसेच माझ्या दोन्ही मुलांचे सहकार्य नेहमीच लाभले आणि रसिकांचे भरभरून प्रेम मिळाल्यामुळेच मी आज येथवर पोहोचले, असे मनीषा म्हणाल्या.

याचे उदाहरण म्हणजे सध्या मनीषा निश्चल्स महक कॉन्सर्ट्स’ या आपल्या स्वत:च्या व्यासपीठावरुन लता मंगेशकर यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त देशात एकाच वेळी एकच साँग लिस्ट असलेल्या “स्वरस्वती” या शो चे. शोच्या माध्यमातून वर्ल्ड रेकॉर्डचे आव्हान घेतले आहे.

मागील जवळपास २५ वर्षांत संपूर्ण देशभर तब्बल चार हजारपेक्षा जास्त कार्यक्रम करताना महाराष्ट्र, नवी दिल्ली, देहरादून, हैदराबाद, इंदूर, सुरत, बडोदा, अहमदाबाद, आणंद (गुजरात), बेंगलोर, मैसूर, जयपूर, जोधपूर, चेन्नई, जबलपूर, रायपुर, बैतुल, बेळगांव, गोवा याठिकाणी सांगीतिक प्रस्तुती करण्याचे भाग्य प्राप्त झाले.

या प्रवासात पद्मश्री हृदयनाथ मंगेशकर, लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीतकार जोडीतील प्यारेलाल शर्मा, कल्याणजी-आनंदजी या संगीतकार जोडीतील आनंदजी भाई, सुरेश वाडकर, बाबासाहेब पुरंदरे, मंगेश तेंडुलकर, उषा मंगेशकर, उषा खन्ना, लीना चंदावरकर, आशा काळे, सुमन कल्याणपूर, जगदीश खेबूडकर, रमेश देव, सीमा देव, विक्रम गोखले, रवींद्र महाजनी, अजित कडकडे, अनुप जलोटा, यशवंत देव, अनिल मोहिले, अमित कुमार, साधना सरगम, उत्तरा केळकर, अशोक पत्की, आनंद माडगूळकर, कुणाल गांजावाला, श्रेया घोषाल, सचिन पिळगावकर, आशा पारेख, स्वप्निल जोशी यांच्या बरोबर सादरीकरण करण्याचे भाग्य त्यांना लाभले.

भारतरत्न लता मंगेशकर यांना त्या आदर्श मानतात. सप्टेंबरमध्ये दीदींच्या वाढदिवसाच्या औचित्याने संपूर्ण महिना त्या दीदींच्या गाण्याचे देशभर कार्यक्रम करत आहे. नवीन पिढीमध्ये गाण्याची आवड निर्माण व्हावी हा त्यांचा या कार्यक्रमामागील हेतू आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये