Top 5इतरताज्या बातम्यादेश - विदेशपिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रसिटी अपडेट्स

तळेगाव ढमढेरेत खाजगी कंपनीचे गॅस पाईपलाईनला आग; सुदैवाने कोणतीही हानी नाही मात्र परिसरातील नागरिक भयभीत

तळेगाव ढमढेरे (Talegaon Dhamdhere) : तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथून नागरिकांच्या शेतातून गेलेल्या टोरेंट कंपनीच्या खाजगी गॅस पाईपलाईनला आज दुपारच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याने खळबळ उडाली असून सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नसून शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे मात्र घडलेल्या घटनेने परिसरातील नागरिक व ग्रामस्थ भयभीत झाले आहे.

तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथील शेणाचा मळा येथे आनंदग्राम सोसायटी लगत बाळासाहेब भुजबळ व एकनाथ भुजबळ यांच्या घराच्या शेजारी संतोष नरके यांच्या शेतातून केलेल्या टोरेंट कंपनीच्या खाजगी गॅस पाईपलाईनला आज दुपारच्या सुमारास अचानकपणे आग लागली आणि आगीचे लोळ हवेत पसरू लागल्याने नागरिक भयभीत झाले, घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार किशोर तेलंग, अमोल चव्हाण, अमोल नलगे, विकास मोरे, उद्धव भालेराव, पोलीस पाटील पांडुरंग नरके, अनिल भुजबळ, सागर नरके, सणसवाडीच्या सरपंच सुवर्णा दरेकर यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेत घडलेल्या घटनेची माहिती टोरेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली.

दरम्यान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाईपचे कॉक बंद करत आग विझवली सदर घटनेत कोणतीही हानी झाली नाही मात्र संतोष नरके या शेतकऱ्याच्या शेतातील पिकाचे नुकसान झाले आहे, तर या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झाले असून कंपनीने योग्य उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहे.

तळेगाव ढमढेरे येथे टोरेंट कंपनीच्या गॅस पाईपलाईन उघड्या पडल्या असून घुसींनी बिळे केली असल्याने धोका होऊ शकतो याबाबतच्या तक्रारी मी स्वतः टोरेंट कंपनीच्या कार्यालयात जाऊन केल्या होत्या मात्र त्यांनी लक्ष दिले नसल्याचा आरोप यावेळी स्थानिक शेतकरी संतोष नरके यांनी केला आहे.

तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथे घडलेल्या घटनेबाबत टोरेंट कंपनीचे मॅनेजर सतीश पटेल यांच्याशी संपर्क साधला असता आग लागलेल्या ठिकाणची पाहणी केली असून आगीचे कारण लगेच सांगू शकत नाही तसेच शेतकऱ्याशी बोलणे झाले असून पुढील कार्यवाही करण्यात येईल असे सतीश पटेल यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये