Top 5कव्हर स्टोरीपुणेराष्ट्रसंचार कनेक्टलेखविश्लेषणसंपादकीय

आपल्या सुप्त गुणांना महिलांनी वाव द्यावा : पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके

संवेदनशीलता हा महिलांचा एक गुण आहे. यामुळे त्या कल्पक असतात. कुटुंबाचे पालन पोषण असो किंवा एखादा व्यवसाय असो. समोर येणाऱ्या प्रत्येक संकटावर त्या मात करतात. अशा संकटांना मागे टाकून व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करत आहेत.

महिलांनी आपल्या सुप्त गुणांना वाव द्यावा, आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून स्वावलंबी बनले पाहिजे, असे मत पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी जागर नवदुर्गेचा या उपक्रमात बोलताना सांगितले. महिलांनी स्वयंसिद्धा बनावे.स्वतःचा विचार करावा आणि स्वतःसाठी जगण्याचे शिकावे. आई-वडिलांप्रमाणे सासू -सासरे यांची काळजी घेतली घरात एकोपा आणि सलोखा टिकून राहण्यास मदत होते. आज पिढी बदलत आहे. सासू-सुना, नणंद-भावजयी यांच्यातील संबंधही बदलत आहेत. हा एकप्रकारे शुभसंकेतच म्हणावा लागेल, असेही त्या म्हणाल्या.

आज काही महिला कौटुंबिक जबाबदाऱ्या, व्यावसायिक आव्हाने अशा असंख्य अडथळ्यांवर मात करून सर्वच क्षेत्रांत कर्तृत्व सिद्ध करत आहेत. हे खरोखरच गौरवास्पद आहे. संवेदनशीलता हा महिलांचा एक गुण आहे. यामुळे त्या कल्पक असतात. कुटुंबाचे पालन पोषण असो किंवा एखादा व्यवसाय, समोर येणाऱ्या प्रत्येक संकटावर त्या मात करतात. अशा संकटांना मागे टाकून व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करत आहेत. ‘समाजात विविध क्षेत्रांत महिलांनी आपली वेगळी ओळख बनवली आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वापुढे आसमानही ठेंगणे होत आहे.

महिलांनी विविध स्पर्धांत सहभाग घेऊन उच्चस्तरीय पदावर विराजमान व्हावे. पूर्वीचा काळ फक्त चूल आणि मूल होते. परंतु आत्ताचा काळ बदलला आहे. प्रत्येक स्त्री उंबरठा ओलांडून विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवत आहे. यामध्ये समाजकारण, राजकारण, क्रीडा अथवा प्रशासकीय सेवेत महिलेने स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. आलेल्या संकटावर मात करून त्यातूनही उभारी घ्यावी. संघर्षातून यश हे मिळतेच. त्यामुळे न खचता, न डगमगता धैर्याने पुढे जावे असेही या वेळी त्यांनी महिलांना आवाहन केले आहे. देशात महिलांची संख्या मोठी आहे आणि देशाच्या विकासातही महिलांचे योगदान अधिक आहे. त्यामुळे महिलांची फक्त गृहिणी म्हणून ओळख न राहता त्यांना स्वतःची अशी वेगळी ओळख असणे गरजेचे आहे.

भाग्यश्री बाबूराव नवटके सध्या पोलीस उपायुक्त पदावर असून, आर्थिक व सायबर गुन्ह्े पुणे शहराचे काम पाहत आहे. त्यांच्या कामगिरीवर लक्ष वेधले तर डिसेंबर २०१६ ते जून २०१७ कोल्हापूर सहायक पोलीस अधीक्षक (एएसपी) परिविक्षाधीन कालावधी दरम्यान देहविक्री व्यवसाय विरोधात लक्षणीय कार्यवाही करून पीडित महिलांचे पुनर्वसन केले. डिसेंबर २०१७ ते डिसेंबर २०१८ बीड येथे सहायक पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना वाळू माफिया व लॅन्ड माफिया यांचे विरोधात विशेष मोहीम राबवून गुन्हेगारीस आळा घालण्यात आला. तसेच पोलीस सेवा सामान्य नागरिकांसाठी जास्तीत जास्त सोईस्कर बनविण्यासाठी विशेष प्रयत्न करून जास्तीत जास्त सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला.

डिसेंबर २०१८ ते जून २०१९ एस.आय.डी. सिंधुदूर्ग येथे नेमणूक होती. जुलै २०१९ ते सप्टेंबर २०२० जळगाव येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून नेमणुकीस असताना अवैधरीत्या प्राणघातक शस्त्रे (पिस्तूल) बाळगणाऱ्यांवर प्रभावी कार्यवाही करुन शस्त्रे (पिस्तूल) जप्त केली. तसेच एमपीडीए व मोक्का कायद्यान्वये कार्यवाही करून गुन्हेगारीस प्रतिबंध घातला. अपर पोलीस अधीक्षक जळगाव येथे नेमणुकीस असताना रावेर तालुक्यात झालेली हिंदू-मुस्लिम दंगल प्रभावीपणे हाताळून अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत दक्षता घेतली.

ऑक्टोबर २०२० ते आजपर्यंत पोलीस उपायुक्त आर्थिक व सायबर गुन्हे, पुणे शहर येथे कार्यरत असताना नमूद महत्त्वाच्या गुन्ह्याचे तपासी अधिकारी यांना मार्गदर्शन केलेले आहे. भाईचंद हिराचंद रायसोनी या मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या आर्थिक गैरव्यवहारामध्ये सुमारे १,६९,००० गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झालेले आहे., सायबर पोलीस स्टेशन पुणे यांना योग्य ते मार्गदर्शन करत आहे. विविध बँक खात्यावर जमा असलेले सामान्य नागरिकांचे २१६ कोटी रुपये चोरण्याचा सायबर गुन्हेगारांचा कट उधळून लावला व गुन्हेगारांना यशस्वारीत्या अटक केली.

शिवाजीराव भोसले सहा. बँक घोटाळा गुन्ह्याचे तपासादरम्यान आतापर्यंत ११ महत्त्वाचे आरोपी अटक करुन मूळ फसवणूक रक्कम ७१,७८,८७,७२३/- रुपये इतकी असताना नव्याने रु.४९६.४६ कोटी इतकी फसवणूक, अपहाराची रक्कम निष्पन्न केली आहे. ऑनलाईन आर्थिक फसवणुकीस बळी पडणाऱ्या पीडित लोकांचे निराकरण करणेसाठी गोल्डन अवर ही हेल्पलाईन चालू करण्यात आलेली आहे. सदर हेल्पलाईनवर तक्रारदाराने फसवणूक होताच तत्काळ संपर्क साधल्यास पैशाचा परतावा मिळण्याची शक्यता अधिक आहे.

आरोग्य विभाग गट (ड) परीक्षेची पेपरफुटी, म्हाडा परीक्षेचा पेपर फोडण्याचा डाव उधळून लावला. तसेच सन २०१९-२० व सन २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या टी.ई.टी. परीक्षेमधील अपात्र उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र दाखवून शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न करून सायबर पोलीस स्टेशन येथे गुन्हे नोंद करून शासनाची व प्रामाणिक विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करून एकूण ८५ आरोपींना अटक केली. अामिष दाखवून ५७० मूकबधिर, कर्णबधिर लोकांची आर्थिक फसवणूक करण्यात आलेली होती. नमूद तपासी अधिकारी यांना वेळोवेळी केलेल्या उत्कृष्ट मार्गदर्शनामुळे गुन्ह्यामध्ये ४६७ मूकबधिर साक्षीदार इसमांशी संवाद साधून कौशल्यपूर्वक तपास केलेला असून महत्त्वाचे आरोपी अटक त्यांचेविरुद्ध विहित वेळेत दोषारोपपत्र सादर करण्यात आलेले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये