लग्न करताय? सावधान! बनावट नवरी अन् बनावट मामाने नवरदेवासोबत केलं असं काही… धक्कादायक घटना समोर
Fake Marriage Racket (pargaon) :
परगांव : सध्या लग्नाचा विचार करणाऱ्या लग्नाळू युवकांना फसविणारी एक टोळी पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात सक्रिय झाली आहे. यामुळे अनेकांना लाखोंचा गंडा घातला जात आहे. ही टोळी लग्नाळू युवकांना फसवत आहे.
ही टोळी फसवी नवरी, बनावट खोटे आई- वडील व मामा असे लबाड नातेवाईक बनून नियोजित नवरदेव आणि त्याच्या कुटूंबाला लाखोंचा गंडा घालत आहे. यामुळे आता लग्न जमवणे आणि ते टिकवणे मोठे जिकरीचे झाले आहे. याबाबत आता खात्री असणे गरजेचे झाले आहे.
सध्या दौंड(Daund) तालुक्यातील वरचेवर फसवणूक करणारी टोळी लग्न जमवून देण्याच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक करत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.ही टोळी लग्नासाठी इच्छुक असलेल्या तरुणांना आणि त्यांच्या पालकाला हेरते आणि तुमच्या मुलाला चांगले स्थळ मिळून देण्याच्या नावाखाली , त्यांची लाखो रुपयांना फसवणूक करून वादग्रस्त वक्तव्य करून पळून जात आहे.
लग्न होत नसलेल्या ग्रामीण भागातील तरुणांना हेरून जाळ्यात अडकवायचे,त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून, दागिने करून एकदा लग्न लावून द्यायचे, लग्नानंतर काही दिवसांत माहेरी जाऊन येते, असे सांगून तोतया नवरीने अंगावरील दाग-दागिन्यांसह कायमस्वरूपी फरार व्हायचे, असे प्रकार उघडकीस आले आहेत आपली चर्चा होऊ नये अब्रूच खोबरं होऊ नये म्हणून काही प्रतिष्ठित लोक यापासून चर्चा न करण्यामुळे या बनावटी लोकांचं सध्या फावत आहे . पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण पोलिसांकडून याबाबत सांगण्यात आले. दौंड तालुक्यातही असे प्रकार दिवसेंदिवस उघडकीस येऊ लागल्याचे यवत पोलिसांनी सांगितले आहे. यवत पोलिस ठाण्यात नुकत्याच दाखल झालेल्या तक्रारीवरून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
लग्नानंतर दौंड तालुक्यातील घरी येत असताना नवरी-नवरदेवाच्या मोबाईलवरून अनोळखी नंबरवर व्हॉट्सअॅप चॅटिंग व लोकेशन पाठवत होती. या गोष्टीचा नवरदेवाला संशय आला. नंतर नवऱ्याने याबाबत पोलिसांना माहिती दिल्याने हे प्रकरण उघडकीस आले आहे.याबाबत काहींना अटक केली गेली आहे. याप्रकरणी बाबू चव्हाण (रा.यवत, ता. दौंड), सिंधू माळी (रा.कोरेगाव भीमा, ता. शिक्रापूर), नवरीचा मामा सांडू यशवंत जाधव (रा. मड, जि.बुलडाणा), सतीश मधुकर जोशी (रा.अशोकनगर, सातपुते, जि. नाशिक)यांना अटक केली आहे.
तसेच तोतया नवरी चित्रा अंभोरे आदींसह नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला. यामुळे आता लग्न जमवताना देखील पूर्ण खात्री करून आणि आपल्या ओळखीतल्या व्यक्तींकडे चौकशी करणे आवश्यक आहे. खात्रीलायक माहितीनुसार सध्या अशा टोळ्या पूर्ण नियोजन करून सगळीकडे सक्रिय झाली आहे.