राज्यात पुन्हा कोरोनाचं थैमान; नव्या व्हेरियंटमुळे वाढली डोकेदुखी, मुंबईत रूग्णांच्या संख्येत वाढ
मुंबई | Corona New Variant : देशात कोरानानं (Corona) पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. त्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने डोकेदुखी वाढवली आहे. कोरोनाचा JN1 हा नवा व्हेरियंट आला असून याबाबत मुंबई महापालिका आरोग्य विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी दक्षा शाह यांनी JN1या नव्या व्हेरियंटबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, हा नवीन व्हेरियंट सौम्य स्वरूपाचा आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसंच मुंबई महापालिकेकडून रूग्णांच्या उपाचारासंदर्भात सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
सध्या महाराष्ट्रात 100 हून अधिक कोरोना रूग्ण आढळले आहेत. यामध्ये JN1 या नव्या व्हेरियंटच्या रूग्णांचा देखील समावेश आहे. तर मुंबईत 19 कोरोना रूग्ण आढळले आहेत. या सर्व रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, JN1 हा कोरोनाचा नवा व्हेरियंट सौम्य आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नका, तसंच काळजी घ्या, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. सोबतच गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा आणि मास्क वापरणाच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.