“कोणी गोळीबार करतंय, कोणी चून-चून के मरेंगे म्हणतंय, अरे काय बापाचं…”
!["कोणी गोळीबार करतंय, कोणी चून-चून के मरेंगे म्हणतंय, अरे काय बापाचं..." ajit pawar 1 1](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/09/ajit-pawar-1-1.jpg)
बीड – Ajit Pawar in Beed: शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात अनेक वादाच्या घडामोडी घडत आहेत. अनेकवेळा शिंदे गटातील कार्यकर्ते आणि शिवसैनिकांत शिवीगाळ पासून मारामारी पर्यंत वाद पोहोचताना दिसत आहेत. दरम्यान, आता विरोधी पक्षनेते अजित पावर यांनी शिवीगाळ करणाऱ्या, धमक्या देणाऱ्या आमदारांचे कान टोचले आहेत. बीडमध्ये अयोजीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते.
“गेल्या तीन महिन्यांपासून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. सत्ताधारी पक्षाचेच आमदार गोळीबार करत आहेत, शिवीगाळ करत आहेत, धमक्या देत आहेत तर जनतेनं न्याय कोणाकडे मागायचा? हे तर अतिक्रमणच झालं.” असं संतप्त वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.
“गोळीबार करणे, शिवीगाळ करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कोण चुकीचं वागत असेल तर त्यांना शासन झालंच पाहिजे. काही आमदार तर हात पाय तोडण्याची भाषा करतात. विरोधकांचे हातपाय तोडायला काही आमदार सांगतात. जर कोणी आडवलं तर मी उभा आहे असंही म्हणतात. अरे काय बापाचं राज्य आहे काय? हे तुम्ही कसकाय बोलू शकता? इतर राज्यांत त्या घटना घडत असतील मग महाराष्ट्राला त्याच पातळीवर न्यायचं आहे काय? काही आमदार तर गिन गिन के चून चून के मरेंगेची भाषा करतात… कोण कुणाला मारतंय काय करतंय… बाकीच्यांनी काय बांगड्या भरल्यात काय? गिनता तरी येतं का?” असा सवाल अजित पवारांनी केला आहे.