परश्यानं सांगितली लग्नासाठीची एकमेव अट; म्हणाला, “ज्या मुलीला…”
मुंबई | Akash Thosar – ‘सैराट’ (Sairat) या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आले ते म्हणजे आर्ची आणि परश्या. आर्चीनं तर सर्वांना वेड लावलंच आहे पण सोबतच परश्यानंही चाहत्यांना भूरळ घातली आहे. परश्या ही भूमिका साकारणारा आकाश ठोसर (Akash Thosar) नेहमीच चर्चेत असतो. तो आता लवकरच प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या ‘घर, बंदूक, बिरयानी’ (Ghar, Banduk, Biryani) या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटामुळे आकाश ठोसर पुन्हा एकदा चर्चेत आला असून आता त्याच्या लग्नाचीही चर्चा सुरू आहे.
आकाश ठोसर लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. तर नुकतंच त्यानं घर, बंदूक, बिरयानी या त्याच्या आगामी चित्रपटाच्या निमित्तानं एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यानं त्याला लग्नासाठी कशी मुलगी हवी आहे? याबद्दल स्पष्टीकरण दिलं.
आकाशला मुलाखतीत तुला स्वयंपाक बनवता येतो का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यानं उत्तर दिलं की, “मला स्वयंपाक खूप छान बनवता येतो. कारण पाच वर्ष मी तालीमीत राहिलो आहे. तिथे तुम्हाला तुमचं जेवण स्वत:लाच बनवायला लागतं. त्यामुळे आम्ही आमचं जेवण स्वत: बनवायचो. त्यामुळे मी पोळी, भाजी आणि बिरयानी खूप छान बनवू शकतो.”
पुढे त्यानं लग्नासाठी मुलगी कशी हवी आहे याबद्दल सांगितलं. “मला लग्नासाठी अशी मुलगी हवी आहे की जिला बिरयानी खूप छान बनवता येते. तिच्याशी मला लग्न करायला नक्कीच आवडेल. कारण ज्या मुलीला बिरयानी बनवता येते, तिला कुठलाही स्वयंपाक बनवता येऊ शकतो”, असं आकाश म्हणाला.