बाॅलिवूडचा खिलाडी जखमी, शूटिंगदरम्यान झाली दुखापत
मुंबई | Akshay Kumar – बाॅलिवूडचा (Bollywood) खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार (Akshay Kumar) लवकरच त्याचा आगामी चित्रपट ‘बडे मियां छोटे मियां’मधून (Bade Miyan Chote Miyan) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या शूटींगमध्ये सध्या तो व्यस्त आहे. तसंच या चित्रपटातील अॅक्शन सीनचं शूटिंग करण्यासाठी अक्षय स्काॅटलँडला गेला होता. त्यावेळी शूटिंगदरम्यान तो जखमी झाला असून त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे.
एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार अभिनेता टायगर श्रॉफसोबत (Tiger Shroff) अॅक्शन सीन शूट करत होता. हा सीन शूट करताना अक्षयला दुखापत झाली असून त्याच्या गुडघ्याला किरकोळ जखम झाली आहे. तरीही अक्षयनं जखमी अवस्थेतच शूटिंग पूर्ण केलं आहे.
दरम्यान, ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफसोबत सोनाक्षी सिन्हा आणि पृथ्वीराज सुकुमारन हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्दर्शक अली अब्बास जफरनं केलं आहे. तसंच या चित्रपटातून पहिल्यांदाच अक्षय आणि टायगरची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.