ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

‘शुरु करो स्वागत की तैयारी…’ ; अक्षयच्या ‘OMG 2’ चा ट्रेलर खरचं लई भारी..

Akshay kumar OMG 2 Trailer : नितीन देसाई यांच्या निधनामुळे एक दिवस पुढे ढकलण्यात आलेल्या खिलाडी अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ओएमजी- 2 (OMG 2) या चित्रपटाचा ट्रेलर आज अखेर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमधील डायलॉग आणि कलाकारांच्या अभिनयानं प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. पुढील आठवड्यात 11 तारखेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटील येणार आहे.

या ट्रेलरमध्ये अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) हे कांती शरण मुद्गल या भूमिकेत दिसत आहेत. कांती शरण मुद्गलच्या कुटुंबामध्ये काही अडचणी येत असतात. या अडचणींचा सामना ते कसे करतात? यामध्ये अक्षय कुमार हा त्यांची मदत कशी करतो? हे सर्व ओएमजी- 2 या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे, असा अंदाज ओएमजी- 2 हा चित्रपट पाहिल्यानंतर लावला जाऊ शकतो.

ओएमजी- 2 (OMG 2) या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला ‘नंदी मेरे भक्त पर विपदा आने वाली है मेरे शिवगण में से किसी ऐसे को ले जाओ जो उसकी रक्षा कर सके’ असा डायलॉग ऐकू येतो. ट्रेलरमध्ये दिसते की, पंकज म्हणजेच कांती शरण मुद्गल देवाची भक्ती करताना दिसत आहेत. त्यांचे कुटुंब भगवान शंकराची भक्ती करत असते. अचानक त्यांच्या मुलासोबत एक घटना घडते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये