प्रसिद्ध अभिनेत्रीनं केलं टाॅपलेस फोटोशूट; अमृता खानविलकर कमेंट करत म्हणाली, “बेबी…”

मुंबई | Asha Negi – अभिनेत्री आशा नेगी (Asha Negi) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘पवित्रा रिश्ता’ या मालिकेतून ती घराघरांत पोहोचली आहे. तसंच ती सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आताही आशाने टाॅपलेस फोटोशूट केलं असून ते फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या तिच्या या फोटोंची जोरदार चर्चा सुरू आहे.
आशा नेगीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही टाॅपलेस फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आशा अंगाभोवती टाॅवेल गुंडाळत तिच्या बेडरूममध्ये बेडवर बसलेली दिसत आहे. तिच्या या हाॅट फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
आशाने टाॅपलेस फोटो शेअर करत म्हटलं आहे की, “मी देखील एकदा बेडवर बसून नाश्ता करण्यास पात्र आहे.” आशाच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांची लाइक्सचा वर्षाव केला आहे. तसंच चाहत्यांनी आणि काही कलाकारांनी तिच्या या टाॅपलेस फोटोशूटवर कमेंट्स देखील केल्या आहेत. यामध्ये मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनंही आशाच्या फोटोवर कमेंट केली आहे. अमृता खानविलकरनं कमेंट करत म्हटलं आहे की, “बेबी सो हाॅट.” तसंच आशाचे हे फोटो पाहून नेटकरीही घायाळ झाले आहेत.
