रेल्वेगाडी आणि स्थानके हा आयकॉनिक सप्ताह
![रेल्वेगाडी आणि स्थानके हा आयकॉनिक सप्ताह FYGEp wVsAE5JfY](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/07/FYGEp_wVsAE5JfY.jpeg)
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव : रन फॉर युनिटी मोहिमेला प्रारंभ
पुणे : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा एक भाग म्हणून पश्चिम रेल्वेने पश्चिम रेल्वे मुख्यालयातून हिरवा झेंडा दाखवत मोटारसायकल रॅली आणि ‘रन फॉर युनिटी’ मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. या रॅलीमध्ये पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, वडोदरा, अहमदाबाद, रतलाम, भावनगर आणि राजकोट या सर्व सहा विभागातील रेल्वे पोलिस दलाच्या (आरपीएफ) कर्मचार्यांचा समावेश आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर, पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक नरेश ललवानी आणि पश्चिम रेल्वेचे प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त, पी.सी. सिन्हा यांनी १९ जुलै २०२२ रोजी रेल्वे पोलिस दलाच्या मोटारसायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. महात्मा गांधी यांनी ज्या साबरमती आश्रमापासून प्रसिद्ध दांडी यात्रेला सुरुवात केली होती, त्या ऐतिहासिक साबरमती आश्रमापर्यंत या रॅलीला पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयातून हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.
२५ दुचाकींवर पश्चिम रेल्वेच्या रेल्वे पोलिस दलातील (आरपीएफ) ५० कर्मचारी स्वार झाले असून, या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत. ही रॅली संजन, वलसाड, बिलिमोरा, नवसारी, सुरत, अंकलेश्वर, वडोदरा मार्गे साबरमती आश्रमात पोहोचेल.
१ जुलै २०२२ रोजी पश्चिम रेल्वेच्या सर्व विभागीय मुख्यालयांतून मोटारसायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला, यात मुंबई, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील पश्चिम रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील ७५ महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचा समावेश होता. त्यानंतर ही रॅली पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात पोहोचली.
पश्चिम रेल्वेच्या रेल्वे पोलिस दलातील ६५०० पेक्षा जास्त कर्मचार्यांनी सर्व विभागांमध्ये ‘रन फॉर युनिटी’मध्ये सहभाग घेतला असून, त्यांनी १८,६०० किमीपेक्षा जास्त अंतर कापले आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली. १ ऑगस्ट २०२२ रोजी साबरमती आश्रमामधून पुढे ही दुचाकी रॅली निघेल आणि या मार्गावरील महत्त्वाच्या शहरांमधून ही रॅली १४ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय पोलिस स्मारकात पोहोचेल आणि समारोप समारंभात सहभागी होईल, असे पश्चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकार्यांनी सांगितले.
‘स्वातंत्र्याची रेल्वेगाडी आणि स्थानके’ हा आयकॉनिक सप्ताह स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचा एक भाग म्हणून, भारतीय रेल्वे १८ ते २३ जुलै २०२२ या कालावधीत ७५ स्थानके आणि २७ रेल्वेगाड्यांमध्ये “स्वातंत्र्याची रेल्वेगाडी आणि स्थानके” हा आयकॉनिक सप्ताह साजरा करत आहे. या विशेष गाड्या आणि स्थानके भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या गौरवशाली इतिहासाशी संबंधित महत्त्वाची ठिकाणे आणि घटना दर्शवतात.
या अनुषंगाने पश्चिम रेल्वे या महोत्सवाच्या सप्ताहाच्या उत्सवात मोठ्या उत्साहात सहभागी होत आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या विविध टप्प्यांमध्ये राष्ट्रीय महत्त्व असलेल्या पोरबंदर, साबरमती, नवसारी, अडस रोड आणि बारडोली या पश्चिम रेल्वेच्या स्थानकांची यासाठी निवड करण्यात आली आहे .