ताज्या बातम्यामनोरंजन

अंकित मोहनच्या चिमुकल्या लेकाचा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, व्हिडीओ होतोय व्हायरल

मुंबई | अभिनेता अंकित मोहन हा नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत येत असतो. तसंच तो फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड अशा अनेक चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला होता. त्याचबरोबर तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. तो नेहमी त्याच्या बाळाचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. नुकतंच अंकितने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या लेकाचा एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे.

अंकित मोहननं त्यांच्या इन्स्टाग्राम आकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अंकित हा त्याचा मुलगा रुआनला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला नमस्कार करायला शिकवत आहे. त्यासोबत अंकितने एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. या व्हिडीओत रुआन हा छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करताना दिसत आहेत.

अंकित या फोटोला कॅप्शन देताना म्हणाला, “छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराज आज तुमचा लहान मावळा 7 महिन्यांचा झाला आहे. त्याच्यावर तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या. रुआनला 7 महिन्यांच्या शुभेच्छा. बाळाला प्रेम आणि आशीर्वाद पाठवत राहिल्याबद्दल सर्वांचे आभार.” तसंच त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये