ताज्या बातम्यामनोरंजन

“बायकोला पहिल्या आणि शेवटच्या गर्लफ्रेंडबद्दल सांगितलं अन्…”, ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्याचा खुलासा

मुंबई | Ankur Wadhave – झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) हा कार्यक्रम चांगलाच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमामधील प्रत्येक कलाकारानं त्यांच्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अंकुर वाढवे (Ankur Wadhave). अंकुर वाढवेनं त्याच्या अभिनयाच्या जोरावर आपली ओळख निर्माण केली आहे. त्याच्या चाहता वर्ग देखील प्रचंड मोठा आहे. तसंच अंकुर सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. तसंच आता अंकुरनं सोशल मीडियावर त्याच्या बायकोसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यानं त्याच्या खासगी आयुष्याबाबतही खुलासा केला आहे.

अंकुरनं त्याच्या पत्नीबरोबरचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अंकुरनं त्याची हटके लव्हस्टोरी शेअर केली आहे. तो म्हणाला की, “आयुष्यात कधीही प्रियसी भेटली नाही, एक भेटली पण आंतरजातीय म्हणून लग्नासाठी नकार दिला. यानंतर मी निर्णय घेतला कधीही लग्न करायचं नाही आणि केलं तर love marriage. कारण माझं असं म्हणणं होतं की अरेंज मॅरेजमध्ये कदाचीत मुली आई बाबांच्या दबावाखाली हो म्हणतात आणि love marriage साठी मला कोणी स्विकारणार नाही हेही तेवढंच सत्य. कारण प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला राजकुमार ठरलेला असतो त्यात मी बसत नाही म्हणून ठरवलं होत लग्न न करणच ठीक आहे.”

“निकिताच स्थळ आलं आणि तिला न बोलता न भेटता हो बोललो पण तिची इच्छा असेल तर त्याच कारणं अस की ती माझ्या मामाची मुलगी तिला काही गोष्टी माहित होत्या माझ्याबद्दल. फायनल होण्याआधी एक कॉल केला तिला माझ्या सवई (सगळ्या) आणि पहिली आणि शेवटची gf बद्दलही स्पष्ट बोललो. तरीही ती हो बोलली… आणि मला जशी हवी होती तशीच gf भेटली… मित्र आहेत असतील पण किमान आतापर्यंत तरी मी तुला आणि तू मला कधीच अंधारात ठेवत नाही.. कदाचीत हे love marriage मध्ये मिळालं नसतं I LOVE YOU FOREVER बायको आयुष्यभर माझी valentine आहेस”, अशी खास पोस्ट अंकुरनं त्याच्या बायकोसाठी व्हॅलेंटाइन डे दिवशी पोस्ट केली होती. मात्र, अंकुरनं सांगितलेली त्याची ही लव्हस्टोरी चाहत्यांना चांगलीच आवडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये