शिंदे-फडणवीसांच्या चार महिन्याच्या कार्यकाळात महाराष्ट्रावर पाचव्यांदा सर्जिकल स्ट्राईक…

मुंबई : (Arvind Sawant On Eknath Shinde) वेदांता- फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज पार्क, मेडिसीन डिव्हाईस पार्क, टाटा एअरबस पाठोपाठ आता विमान तसेच क्षेपणास्त्रांचे इंजिन बनवणारी फ्रेंन्च मल्टिनॅशनल कंपनी सॅफ्रन ग्रुप महाराष्ट्राबाहेर गेली आहे. यामुळे जवळपास 2 लाख कोटींची गुंतवणूक आणि 3 लाख रोजगार राज्यातून हलवण्यात आला आहे. हे फक्त शिंदे-फडणवीस यांच्या चार महिन्याच्या कार्यकाळात पाचव्यांदा केला गेलेला सर्जिकल स्ट्राईक आहे.
दरम्यान, या कंपनीनं दोन शहरांचा पर्याय ठेवला होता. यामध्ये एक नागपूर आणि दुसरा हैदराबाद होते. मात्र, नागपूरातील मिहानमध्ये जमिनीची चाचपणी करत असताना त्यांना असं जाणवलं की जमीन मिळायला उशीर लागत आहे. तसंच महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता देखील आहे. त्यामुळं सॅफ्रन कंपनीनं आपला प्रकल्प अखेर हैदराबादला हलवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारला धारेवर धरले आहे. राज्यात सत्तांतर झाल्यापासून पाचवा प्रकल्प राज्याबाहेर गेला आहे. प्रत्येक प्रकल्पांची गुंतवणूक आणि रोजगार याबाबत प्रस्थापित आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्राला अशी दुजाभावाची वागणूक का दिली जात आहे, असे शिंदे-फडणवीस केंद्र सरकारला विचारणार का? की मुक गिळून गप्प बसणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.