Top 5ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरणधुमाळी
ठाकरे सरकारने नामांतराचा प्रश्न अखेर मार्गी लावलाच, औरंगाबाद, उस्मानाबादचं नाव बदललं!
मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राजकीय वाद होत होते. मात्र आता चालू असलेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबादचे नाव हे “संभाजीनगर” तर उस्मानाबादचं नाव हे “धाराशीव” असं करण्यात आलं आहे.
महाविकास आघाडी सरकार आपल्या शेवटच्या घटका मोजत आहे. 30 जुलैला मविआ सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. अशातच राज्य सरकारकडून सरकार कोसळण्यापुर्वी निर्णयांचा सपाटा लावण्यात आला आहे.
दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास देखील मान्यता देण्यात आली आहे.