राजगडच्या अध्यक्षपदी आ. संग्राम थोपटे

उपाध्यक्षपदी पोपटराव सुके
राजगड कारखान्याचा मंदिराप्रमाणे जीर्णोद्धार दिवाळीत करणार. नवीन प्रकल्प ३५०० टनाचा ३२० कोटी रुपयांचा असणार आहे. राजगड परिसरातील शेतकरी कामगारासह ४०००० लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
आमदार संग्राम थोपटे, अध्यक्ष, राजगड कारखाना
भोर : राजगड सहकारी साखर कारखाना अनंतर निगडे (ता. भोर) यांच्या अध्यक्षपदी आमदार संग्राम अनंतराव थोपटे यांची पुनश्च तिसर्यांदा व उपाध्यक्षपदी पोपटराव सुके यांची गुरुवारी (दि. ९) बिनविरोध निवड करण्यात आली. त्यावेळी निवडणूक अधिकारी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, भोर तहसीलदार सचिन पाटील, वेल्हा तहसीलदार शिवाजी शिंदे म्हणून यांनी काम पाहिले.
राजगड कारखान्यात पंचवार्षिक निवडणुकीमध्ये निकाल १७ पैकी १० बिनविरोध व ७ जागेसाठी झालेल्या निवडणुकीतही ७ काँग्रेस पक्षाने जिंकल्या. राजगडच्या स्थापनेपासून थोपटे यांच्याकडे एकहाती सत्ता आहे. संस्थापक माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी संचालक मंडळास, अध्यक्ष व उपाध्यक्षास शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्यांच्या हस्ते अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार आला.
त्यावेळी भोर काँग्रेस अध्यक्ष शैलेश सोनवणे, राजगड ज्येष्ठ संचालक किसनराव सोनवणे, शिवाजीराव कोंडे, प्रतापराव शिळीमकर, चंद्रकांत सागळे, दिनकरराव धरपाळे, शोभाताई जाधव उपस्थित होते. राजगडच्या नवीन प्रकल्पासाठी ५० कोटींची गरज भासणार आहे. सभासदांनी १५००० रुपये शेअर्स रक्कम पूर्ण भरावी. नवीन सभासद शोधण्यास संचालकांस विनंती राजगडचे अध्यक्ष संग्राम थोपटे यांनी केली.