देश - विदेश

ताज महालात होणार! पूजा…

आग्रा : जगप्रसिद्ध ताजमहालमध्ये भगवान शंकराची पूजाअर्चा करण्याची घोषणा अयोध्येतील महंत परमहंस दास यांनी केली होती, त्यासाठी मंगळवारी ते आग्र्याकडे रवाना झाले. पण पोलिसांनी त्यांना रस्त्यातच अडवलं. महंत दास यांचं म्हणणं आहे की, ताजमहाल हा तेजोमहल आहे. महंत परमहंस दास २६ एप्रिल रोजी आग्र्याला गेले होते. यावेळी त्यांनी ताजमहालात नियमबाह्य प्रवेश केल्यानं त्यांना तिथं रोखण्यात आलं.

यावर तपस्वी छावणीचे महंत असलेल्या दास यांनी आपल्या अंगातील भगवी वस्त्रं आणि धर्म दंडामुळं ताजमहालात जाण्यापासून रोखण्यात आलं. तसेच मुस्लिमांच्या इशाऱ्यावर ताजमहालाच्या सुरक्षा रक्षकांनी आपल्याला वाईट वागणूक दिली. यावेळी आमच्या सहकाऱ्यांकडील फोन हिसकावून घेत त्यातील फोटो आणि व्हिडिओ देखील डिलीट करण्याचा आरोप त्यांनी केला होता.

महंत यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक राजकुमार पटेल यांनी म्हटलं की, सुरक्षा चौकशीत महंत यांना धर्मदंड लॉकरमध्ये ठेऊन पुन्हा घेऊन जण्यास सांगण्यात आलं होतं. पण त्यांनी हे मान्य केलं नाही, ते तातडीनं परत निघाले. त्यांच्या कपड्यांवर कुठलाही आक्षेप नव्हता. कोणत्याही रंगाचे कपडे परिधान करुन ताजमहालमध्ये प्रवेश केला जाऊ शकतो.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये