गावसकर यांच्याकडून बाबरला मिळाल्या बॅटिंग टिप्स

मेलबर्न : भारतीय क्रिकेट समालोचक आणि माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकरही समालोचनासाठी मेलबर्न येथे पोहोचले आहेत. भारताचा पहिला सामना २३ आॅक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. सामन्यापूर्वी पाकिस्तानी संघाने गावसकर यांना त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये बोलावले आणि भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.
व्हिडीओमध्ये गावसकर आधी पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याची तब्येत विचारतात आणि नंतर हस्तांदोलन करत वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. सुनील गावसकर पाकिस्तानी संघाला फलंदाजी-क्षेत्ररक्षणाच्या टिप्स देताना दिसत आहेत. या संवादानंतर गावसकर यांनी बाबरला टोपीमध्ये आॅटोग्राफ दिला आणि फोटो क्लिक केला.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर गावसकर यांचे कौतुक होत आहे आणि भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी क्रिकेटपटूंकडून काही तरी शिकावे, असे म्हटले जात आहे.