…तर तुमचा पराभव होईल, पोटनिवडणुकीपूर्वी ‘या’ कारणामुळे वसंत मोरेंचा शिंदे फडणवीसांना इशारा…

पुणे : (Vasant More On Shinde-Fadnavis) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका घेण्यात याव्यात अशी भूमिका घेतली आहे. मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी कसबा पेठ आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीचा (Kasba And Chinchwad Byelection) दाखला देत पुणे महापालिकेची निवडणूक घेण्याची मागणी केली. वसंत मोरे यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट (Facebook Post) केली आहे. प्रशासनाकडून पुण्याचं वाट लावण्याचं काम सुरु असल्याचा आरोप वसंत मोरे (Vasant More) यांनी केला.
मनसे नेते वसंत मोरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला एक प्रश्न असल्याच म्हटलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील भाजपच्या दोन आमदारांचं नुकतंच निधन झालं. तुम्ही तुमची मते कमी होतील म्हणून लगेच त्या त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या, असं वसंत मोरे यांनी सरकारला म्हटलं. मागील एक वर्षापासून आमच्या शहराला कोणताही लोकप्रतिनिधी (नगरसेवक) नाही. प्रशासनाने शहराचं वाटोळं, असं वसंत मोरेंनी म्हटलं आहे.
विकास कामे ठप्प झाली आहेत निधी नसल्यामळे नागरिकांना भेटू वाटत नाही, असंही वसंत मोरे म्हणाले. पुण्यातील आमदार खासदारांनी जरा आमच्या चपलेत पाय घालून पाहावे आणि हो जर कोणत्या पक्षाला सहनुभुती मिळेल म्हणून जर निवडणुका टाळत असताल तर तुमचा पराभव निश्चित समजा कारण जो मनातून हारतो तो रणात काय जिंकणार, असंही वसंत मोरे म्हणाले. त्यामुळे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येत असले, तरी पुण्यातमात्र मनसे आणि शिंदे सरकारमध्ये आलबेल नसल्याचे चित्र दिसून आलं आहे.