ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

गडकरींची तुलना शिवाजी महाराजांशी, राज्यपाल कोश्यारी पुन्हा घसरले, म्हणाले; “शिवाजी तर जुन्या युगाचे,…”

औरंगाबाद : (Bhagat Singh Koshyari On Chhatrapati Shivaji Maharaj) आपल्या सततच्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत राहणारे आणि टीकेचे धनी होणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करुन वादाला तोंड फोडलं आहे. ते म्हणाले, ‘शिवाजी तर जुन्या युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत अनेकजन नवीन युगाचे हिरो आहेत. औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62 वा दीक्षान्त समारंभ आज पार पडला, यावेळी बोलतांना कोश्यारी यांनी हे विधान केले आहे.

त्यांच्या या विधानामुळे शिवप्रेमी संघटनांकडून विरोध होताना पाहायला मिळत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे मागच्या काही काळापासून वादग्रस्त विधानं करत आहेत. विशेषतः महापुरुषांबद्दल बोलतांना त्यांची जीभ घसरलेली आहे. आज औरंगाबाद येथे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि नितीन गडकरी यांना मराठवाडा विद्यापीठाकडून डि.लिट पदवी देण्यात आली. यावेळी त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, “आम्ही जेव्हा शाळेत जायचो, तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे, तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. महाराष्ट्र नवरत्नांची खाण आहे. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये