ताज्या बातम्याशिक्षण
महाविद्यालयीन अभ्यासक्रमात ‘भारतीय संविधान ओळख’ विषय अनिवार्य; उदय सामंत

मुंबई : ‘भारतीय संविधानाची ओळख’ हा विषय सर्व महाविद्यालयांना अनिवार्य करण्यात येत असल्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटद्वारे दिली आहे. १४ एप्रिल या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने काल सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान तयार करण्यातील योगदान आणि इतर कार्ये याची माहिती विद्यार्थ्यांना व्हायला हवी यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. ‘भारतीय संविधाणाची ओळख’ हा विषय सर्व महाविद्यालयांतील सर्व शाखांमध्ये अनिवार्य केल्याने तरूण विद्यार्थ्यांना संविधानातील मूल्यांची ओळख होऊ शकेल. हा शासनाचा मानस आहे.